Thane News: पत्नीला 'तिहेरी तलाक' दिल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी एका ३१ वर्षीय पतीवर गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात राहणाऱ्या आरोपीने मंगळवारी आपल्या २५ वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन केला आणि तिहेरी तलाक घेत असल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून त्या व्यक्तीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, २०१९ मध्येच तिहेरी तलाकवर बंदी घातली होती.
पत्नी एकटी फिरायला गेल्याने पती संतापला
पत्नीला 'तिहेरी तलाक' देणाऱ्या पतीवर ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. देशात २०१९ मध्ये तिहेरी तलाकवर बंदी घालण्यात आली होती. मुंब्रा परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय आरोपीने मंगळवारी आपल्या पत्नीच्या वडिलांना फोन केला. तिहेरी तलाकच्या माध्यमातून आपण आपले लग्न संपवत असल्याचे आरोपीने सांगितले. पत्नी एकटी फिरायला गेल्याने तो नाराज झाला.
पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पत्नीने बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी पतीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (४) आणि मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.
तिहेरी तलाक असंवैधानिक म्हणून घोषित
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने २२ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात तिहेरी तलाक असंवैधानिक म्हणून घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने १४०० वर्षे जुनी प्रथा असंवैधानिक घोषित केली आणि सरकारला कायद्यात बदल करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कायदा करताना तीन तलाक बोलून किंवा लिहून विवाह संपवणे हा गुन्हा ठरवला. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद आहे.
संबंधित बातम्या