Viral Video : टॉवेल लावून बाल्कनीत फिरायचा, वारंवार सांगूनही ऐकलं नाही, संतापलेल्या गावकऱ्यांनी दिला चोप!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video : टॉवेल लावून बाल्कनीत फिरायचा, वारंवार सांगूनही ऐकलं नाही, संतापलेल्या गावकऱ्यांनी दिला चोप!

Viral Video : टॉवेल लावून बाल्कनीत फिरायचा, वारंवार सांगूनही ऐकलं नाही, संतापलेल्या गावकऱ्यांनी दिला चोप!

Jan 04, 2025 08:21 PM IST

Thane Mumbra Viral Video: ठाण्यातील मुंब्रा येथे टॉवेल लावून बाल्कनीत फिरणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: मुब्य्रात टॉवेल घालून बाल्कनीत फिरणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण
व्हायरल व्हिडिओ: मुब्य्रात टॉवेल घालून बाल्कनीत फिरणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण

Thane Shocking News: ठाण्यातील मुंब्रा परिसरात बाल्कनीत टॉवेल लावून फिरणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, ही घटना नेमके कोणत्या दिवशी घडली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. या मारहाणीत जखमी झालेल्या इसमाला मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

मुस्तकीन खान संबंधित तरुणाचे नाव आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तीन ते चार जण मस्तकीनला मारहाण करताना दिसत आहेत. तो मदतीसाठी आरडाओरडा करत आहे, पण एकही व्यक्ती त्याच्या वाचवण्यासाठी आले नाही. या संदर्भात पोलिसांनी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नेमके प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तकीन हा ठाण्यातील मुंब्रा येथील खर्डी रोड येथील खलील कंपाऊंडमध्ये राहतो. मुस्तकीन दररोज बाथरुममधून टॉवेलवर बाहेर येतो. त्यानंतर तसाच बाल्कनी आणि घरात फिरतो. त्यानंतर अंगावरील टॉवेल बाजूला करतो. त्यावेळी त्याच्या खिडकीचे पडदे उघडेच असतात. त्याच्या अशा कृत्यामुळे समोरच्या फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि विशेषतः महिलांना लज्जा उत्पन्न होते. याबाबत स्थानिक लोकांनी त्याला अनेकदा बजावले होते. मात्र, तरीही मुस्तकीन याने हा प्रकार सुरूच ठेवला. वारंवार सांगूनही मुस्तकीन वागणुकीत कोणताही बदल होत असल्याने स्थानिकांचा पारा चढला. अखेर त्यांनी त्याला खेचत इमारतीखाली आणले आणि त्याला बेदम मारहाण केली, अशी माहिती समोर येत आहे.

मारहाणीत जखमी झालेला व्यक्ती रुग्णालयात दाखल

या मारहाणीत मुस्तकीन जखमी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, राजकीय लोक मागणी करत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु, मुस्तकीनला वारंवार समजावूनही तो असे कृत्य करत असल्याने त्याला अद्दल घडवण्याची आवश्यकता होती, अशी प्रतिक्रिया स्थानिक लोक देत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर