Thane: ठाण्यातील कोलशेत खाडीत तरुणाला बुडताना पाहून मजुराची पाण्यात उडी, ५० मीटर पोहत वाचवला जीव!
Thane Laborer Saves Youth Life: ठाण्यातील कोलशेत खाडीत बुडणाऱ्या तरुणाचा एका मजुराने जीव वाचवला आहे.
Thane News: ठाण्यातील कोलशेत खाडीत तरुणाला बुडताना पाहून एका मजुराने स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचवले आहेत. मंगळवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मानसिकदृष्या खचलेल्या या तरुणाने कारसह खाडीत उडी मारून आत्महत्येचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. हे पाहताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या मजुराने ५० मीटर पाण्यात पोहत तरुणाचा जीव वाचवला. या मजुराच्या कृत्याची प्रशंसा होत आली. तसेच तरुणाच्या कुटुंबियांनी मजुराला १००० रुपये बक्षीस म्हणून दिले.
ट्रेंडिंग न्यूज
मंदीप शिल्पकार (वय, २०) असे मजुराचे नाव आहे. मंदीप हा कोलशेत खाडी येथील गणेश विसर्जन घाटाजवळील एका ढाब्यावर काम करतो. मंगळवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मंदीप त्याच्या एका सहकाऱ्यासोबत कचरा फेकण्यासाठी खाडीजवळ गेला. त्यावेळी त्याला एक तरुण कारसह पाण्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसला. यानंतर मंदीपने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीत उडी घेतली आणि ५० मीटर पोहत जाऊन तरुणाचा जीव वाचवला.
मंदीपने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा खाडीजवळ फक्त दोन-तीन लोक होती. कार डुबताना पाहून सगळेच घाबरले. काहींनी तर जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. कारपासून १०० मीटर अंतरावर होतो. कारमधील तरुणाचा चेहरा मला माझ्या भावाची आठवण करून देत होता. यानंतर मी कशाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. देवाच्या कृपने त्या तरुणाचे प्राण वाचवण्यात मला यश आले. कारण, आधीच पाच ते दहा मिनिटे उशीर झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाच्या नातेवाईकांना याबाबत कळवले. तरुणाने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला, असे घटनास्थळी दाखल झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. तरुणाचा जीव वाचवणाऱ्या मजुराला नातेवाईकांनी बक्षीस म्हणून १००० रुपये दिले.
विभाग