मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Murder : ठाणे हादरले! दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रशिक्षकाने केली कबड्डीपटूची गळा आवळून हत्या

Thane Murder : ठाणे हादरले! दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रशिक्षकाने केली कबड्डीपटूची गळा आवळून हत्या

May 29, 2024 09:48 AM IST

Thane Murder : ठाण्यात कोलशेत येथे एका घरात एका मुलीचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात या मुलीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. ही मुलगी कबड्डीपटू असून तिच्या प्रशिक्षकाने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रशिक्षकाने केली कबड्डीपटूची गळा आवळून हत्या
दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रशिक्षकाने केली कबड्डीपटूची गळा आवळून हत्या

Thane Murder : एका महिला कबड्डीपटूच्या हत्येने ठाणे हादरले आहे. काही दिवसांपूर्वी एका घरात एका मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यात या मुलीची गळा आवळून हत्या झाल्याचे उघड झाले होते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करतांना या मुलीच्या प्रशिक्षकानेच एकतर्फी प्रेमातून आणि दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून तिचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

pan card : 'या' तारखेच्या आधी पॅन आधारशी लिंक करा! अन्यथा भरावा लागेल जादा टीडीएस; या पद्धतीने करा पॅन आधारशी लिंक, वाचा

गणेश गंभीरराव (वय २३) असे कबड्डी प्रशिक्षकाचे नाव आहे. तर हत्या झालेली मुलगी ही अल्पवयीन आहे. पोलिसांनी आरोपी गणेशला अटक केली आहे. गणेशचे खून करण्यात आलेल्या मुलीवर प्रेम होते. मात्र, तीचे दुसऱ्या कुणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातुण त्याने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

Pune Porsche:पुण्यातील दोघांच्या मृत्यूवर निबंध लिहिण्यास सांगणाऱ्या न्यायाधीशांवरही होणार कारवाई? १५ तासात मिळाला जामीन

मृत मुलगी ही ठाण्यातील कोलशेत येथे एका चाळीत भाड्याच्या घरात राहत होती. तिच्या सोबत तिची आई व भाऊ देखील राहायचे. मात्र, ते काही दिवस बाहेर गेले होते. दरम्यान, २४ मे रोजी ती राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत होती. ही बाब घरमालकाने पोलिसांना सांगितली. पोलिस घरात आले असता घरात १७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. घरामध्ये मुलीचे आई व भाऊ दोघेही नव्हते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करत तिचा मृतदेह हा विच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला. शव विच्छेदन अहवाल हा २५ मे रोजी आला. यात तिचा मृत्यू हा गळा आवळून आणि मारहाण करून झाल्याचे स्पष्ट झाले. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तिच्या आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. यात तिची ओळख ही कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव सोबत असल्याचे पुढे आले. पोलिसांनी गणेश याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक केली. तयाची चौकशी केली असता त्याने तिचे दुसऱ्या मुळाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तिची हत्या केल्याचे कबूल केले.

मृत मुलीला कबड्डीची आवड

मृत मुलगी ही कबड्डी पटू होती. तिला कबड्डी खेळण्याची आवड होती. यासाठी ती गणेश याच्याकडे प्रशिक्षण घेत होती. दोघांची मैत्री झाली होती. गणेश तिच्यावर प्रेम करत होता. दरम्यान, २३ मे रोजी तो तिच्या घरी गेला. मुलगी घरी एकटी असताना गणेश तिच्या घरी गेला. यावेळी ती फोनवर दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होती. यातून तिचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय गणेशला आला. तो तिच्यावर प्रेम करत असल्याने त्याने तिला जाब विचारला. यावरून दोघांचे भांडण झाले. या भांडणात रागाच्या भरात त्याने तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळला व नंतर कात्रीने तिच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. यानंतर बाहेरून दरवाजा ओढून तो फरार झाला.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग