Thane Accident: कामावर जाताना ट्रकची धडक; ठाण्यातील घोडबंदर रोडवर बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Accident: कामावर जाताना ट्रकची धडक; ठाण्यातील घोडबंदर रोडवर बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Thane Accident: कामावर जाताना ट्रकची धडक; ठाण्यातील घोडबंदर रोडवर बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Nov 14, 2024 12:51 PM IST

Truck Rams Two-Wheeler In Thane: ठाण्यातील घोडबंदर परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृ्त्यू झाला.

कामावर जाताना ट्रकची धडक; ठाण्यातील घोडबंदर रोडवर बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
कामावर जाताना ट्रकची धडक; ठाण्यातील घोडबंदर रोडवर बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

Thane Hit-And-Run: ठाण्यात बुधवारी भरधाव ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. मयत व्यक्ती कामावर जात असताना हा अपघात घडला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भगवान पटेल असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पटेल हा बुधवारी दुपारी आपल्या होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरने कामावर जात होते. मात्र, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा नाका येथे पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पटेल हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि शहरातील वाहतूक विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी पटेल यांना जखमी अवस्थेत रुग्णलयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातानंतर ट्रक चालकाने जखमीची मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. पादचाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच हा अपघात नेमका कशामुळे घडला? याबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

रस्ते अपघातात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४.६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे. देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर