मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Ganesh Visarjan : ठाण्यात आरती सुरू असतानाच गणेश मंडळाच्या मंडपावर झाड कोसळलं; ५ जण जखमी
गणेश मंडळाच्या मंडपावर झाड कोसळलं
गणेश मंडळाच्या मंडपावर झाड कोसळलं

Thane Ganesh Visarjan : ठाण्यात आरती सुरू असतानाच गणेश मंडळाच्या मंडपावर झाड कोसळलं; ५ जण जखमी

09 September 2022, 23:19 ISTShrikant Ashok Londhe

Thane Ganesh Visarjan : ठाण्यातील कोलबाड येथील कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणपती मंडळाच्या मंडपावर झाड कोसळलं. यामध्ये तेथे उभ्या असलेल्या दोन गाड्यांचेही नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत  आरतीसाठी मंडपात उपस्थित असलेले पाच जण जखमी झाले आहेत.

ठाणे-ठाण्यातील कोलबाड मित्र मंडळाच्या मंडपावर पिंपळाचे झाड पडले आहे. आरती सुरू असताना हे झाड पडलं आहे. मात्र सुदैवानेयात कोणतीहीजीवितहानी झालेली नाही. पाच व्यक्तींना यात मार लागला असून दोघांना रुग्णालयातदाखल करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या दुर्घटनेतील जखमीराजश्री वालावरकर (वय ५५ वर्ष) आणि प्रतिक वालावरकर (वय ३० वर्ष) या दोघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर कीविन्सी परेरा (वय ४०) सुहासिनी कोलुंगडे (वय ५६ वर्ष) वदत्ता जावळे (५० वर्ष) या तिघांना किरकोळ दुखापत झाली.

ठाण्यातील कोलबाड येथील कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणपती मंडळाच्या मंडपावर झाड कोसळलं. यामध्ये तेथे उभ्या असलेल्या दोन गाड्यांचेही नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत आरतीसाठी मंडपात उपस्थित असलेले पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य तीन जणांना किरकोळ मार लागला आहे.

गणेश मंडळाच्या मंडपावर झाड कोसळल्याची माहिती मिळताचआपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी,अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते.