Thane Gallery Collapse : ठाण्यात दोन मजली चाळीची गॅलरी कोसळून दोन जण जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Gallery Collapse : ठाण्यात दोन मजली चाळीची गॅलरी कोसळून दोन जण जखमी

Thane Gallery Collapse : ठाण्यात दोन मजली चाळीची गॅलरी कोसळून दोन जण जखमी

Updated Jun 27, 2024 06:00 PM IST

Thane Dyaneshwar Nagar Gallery Collapse: ठाण्यातील ज्ञानेश्वर नगरात चाळीची गॅलेरी कोसळल्याने दोन जण जखमी झाले, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाण्यात दोन मजली चाळीची गॅलरी कोसळली
ठाण्यात दोन मजली चाळीची गॅलरी कोसळली

Thane News: ठाण्यात दोन मजली चाळीच्या गॅलरीचा काही भाग कोसळल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आरडीएमसी टीमने घटनास्थळी दाखल होऊन ढिगारा साफ केला. या घटनेमुळे चाळीतील दोन खोल्यांचे नुकसान झाले. सदनिका रिकामी करून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. गॅलरीचा उर्वरित भाग खाली पाडण्यात आला आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेटमधील ज्ञानेश्वर नगर येथे पहाटे एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आरडीएमसी टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा साफ केला. विजय ढोके (वय, २७) आणि अनिकेत कांबळे (वय, २४) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली.

एसटीपीची भिंत कोसळून मजुराचा मृत्यू, तीन जखमी

मलनिस्सारण केंद्राच्या (एसटीपी) तळघरात माती खोदल्यामुळे बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाने साइट मालक आणि ठेकेदाराविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायठा रोडवरील सहाय एन्क्लेव्ह टाऊनशिपमध्ये एसटीपीचे काम सुरू असताना सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.अतिरिक्त पोलीस उपायुक्त जितेंद्रकुमार दुबे यांनी सांगितले की, या घटनेत सूर्यलाल (वय, ५०) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव असून तो लखीमपूर खीरी येथील रहिवासी आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा चार जण मातीत अडकले होते.

एफआयआरमध्ये बचनेश पांडे यांनी आरोप केला आहे की, त्यांना इतर जखमींसह जानकीपुरम येथून सकाळी ८ वाजताच्या सुमारास कामावर आणण्यात आले. सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करूनही जागेचे मालक मयूर जयस्वाल आणि पर्यवेक्षक कंत्राटदार कल्लू यांनी कोणतीही खबरदारी घेतली नाही, असे पांडे यांनी एफआयआरमध्ये म्हटले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर