Kalyan Fire: कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग; आगीचा व्हिडिओ समोर!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan Fire: कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग; आगीचा व्हिडिओ समोर!

Kalyan Fire: कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग; आगीचा व्हिडिओ समोर!

Nov 26, 2024 08:44 PM IST

Kalyan Buiding Fire: कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग लागल्याची घटना घडली.

कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग
कल्याणमधील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर मोठी आग

Kalyan Fire News: कल्याणमधील बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज (२६ नोव्हेंबर २०२४) संध्याकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

कल्याणमधील वायले नगरमधील व्हर्टेक्स सोसायटीतील १६ व्या मजल्यावर ही आग लागली. संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्यासाठी रुग्णवाहिका आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण शहरातील बहुमजली इमारतीच्या १६व्या मजल्यावर आज संध्याकाळी आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून त्याचे कारण समजू शकलेले नाही. सुरुवातीला इमारतीच्या १६व्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर ही आग १७व्या आणि १८व्या मजल्यावर पसरली. या आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर