Thane: ठाण्यातील वरप गावात सुटकेसमध्ये आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ-thane decomposed body of man aged 65 70 found in suitcase in varap village murder case filed ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane: ठाण्यातील वरप गावात सुटकेसमध्ये आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ

Thane: ठाण्यातील वरप गावात सुटकेसमध्ये आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ

Aug 17, 2024 01:42 PM IST

Dead Body Found in Thane: ठाण्यातील वरप गावात सुटकेसमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ माजली.

ठाण्यात सुटकेसमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला
ठाण्यात सुटकेसमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला

Thane Dead Body Found News: ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा तालुक्यातील वरप गावात गुरुवारी दुपारी एका सुटकेसमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरप गावातील रहिवाशांना निर्जन भागात सुटकेस आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपासणी केली असता या सुटकेसमध्ये ६५ ते ७० वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. पंचनामा केल्यानंतर पोलिसांना असा संशय आहे की, हा मृतदेह गेल्या तीन- चार दिवसांपूर्वीच या ठिकाणी फेकण्यात आला.

मृतदेहाच्या अंगावर कपडे नसल्याने मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळखीसाठी मृतांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. टॉवर लोकेशन डेटा आणि हरवलेल्या व्यक्तीच्या अहवालांची उलट तपासणी करण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. सुटकेस जप्त करण्यात आली असून त्याचे मूळ शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वृद्धाची हत्या कोणी केली याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासून ही सुटकेस कोणी टाकली याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली.

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या टॉयलेट तरुणाची आत्महत्या

नंदीग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोचच्या टॉयलेटमध्ये घाटकोपर येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर दादर गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांनी सोमवारी एका महिलेसह तिच्या चार साथीदारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दिल्याने त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोपी मृताच्या पत्नीने केला आहे. नंदीग्राम एक्स्प्रेसने शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता दादर रेल्वे स्थानकावर प्रवास थांबवल्यानंतर आणि सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याला शौचालयात त्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याने गार्डला याची माहिती दिली आणि त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. मृतव्यक्तीच्या खिशाची तपासणी केली असता त्यांना काही नावे आणि फोन नंबर असलेली डायरी सापडली.

विभाग