Thane crime news : खळबळजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण, ठाण्यात मांत्रिकासह ७ जणांच्या टोळीला अटक-thane crime police arrested seven persons who exploited girls by claiming that it would rain money ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane crime news : खळबळजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण, ठाण्यात मांत्रिकासह ७ जणांच्या टोळीला अटक

Thane crime news : खळबळजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण, ठाण्यात मांत्रिकासह ७ जणांच्या टोळीला अटक

Mar 03, 2024 08:43 AM IST

Thane Girls exploitation by claiming money rain : ठाण्यात (Thane News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून मुलींचे शोषण (Thane Girls exploitetion) करण्यात आले असून या प्रकरणी मांत्रिक आणि त्याच्या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण, ठाण्यात मांत्रिकासह ७ जणांच्या टोळीला अटक
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे शोषण, ठाण्यात मांत्रिकासह ७ जणांच्या टोळीला अटक

Thane Girls exploitation by claiming money rain : पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल अशी धक्कादायक घटना राज्यातील ठाण्यात उघडकीस आली आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे उघड झाले असून या प्रकारणी मांत्रिक बाबासह सात जणांच्या टोळीला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. या टोळीत महिलेचाही समावेश असून गोरगरीब मुलींना लक्ष्य करून ही टोळी त्यांचे शोषण करत होते. ठाण्यात राबोडी येथील एका अल्पवयीन मुलीचे या टोळक्याने शोषण केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

धक्कादायक! पाकिस्तानला जाणाऱ्या चीनी जहाजात मोठा न्यूक्लियर मिसाइल साहित्याचा साठा; मुंबईतल्या JNPA बंदरात तपास सुरू

असलम खान (वय ५४), सलीम शेख (वय ४५) मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा (वय ६१), तौसिफ शेख (वय ३०), शबाना शेख (वय ४५), शब्बीर शेख (वय ५३) तसेच लालबाग, मुंबईतील हितेंद्र शेट्टे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या राबोडी पोलिस ठाण्यात १५ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून करण्यात येत होता. युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलिस निरीक्षक विकास सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पथकाने कसून तपास करत १७ फेब्रुवारीला राबोडीतील आधी तिघांना अटक केली. तर २७ फेब्रुवारीला मुंबईच्या अँटॉप हिल झोपडपट्टीतील मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा याला अटक करण्यात आली.

Maharashtra weather update : राज्यात आजही पाऊस! विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह बरसणार! असे असेल हवामान

या टोळीने राज्यात तब्बल १७ मुलींचे या प्रकारे शोषण केल्याचे उघड झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही टोळी गोरगरीब पीडित मुलींना लक्ष्य करून त्यांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत होते. याचा व्हिडिओ देखील ते दाखवत होते. मुलींचा विश्वास बसावा या साठी महिलेचा आक्षेपार्ह स्थितीतील रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ मुलींना दाखवला जायचा. यामध्ये महिलेशेजारी पैशांचा ढीग पडलेला असायचा. दरम्यान, या प्रकारे जर पैसे मिळवायचे असेल तर विधी करण्यास सांगून मांत्रिक व त्याचे साथीदार मुलींना फसवायचे आणि यानंतर त्यांच्यावर अत्याचार करीत केला जात होता. राबोडी येथील अपहरण झालेल्या तरुणीच्या तपास परकर्णतून या घटनेचा उलगडा झाला.

पीडित मुलींना आरोपी विधीच्या नावाखाली एका बंद खोलीत आंत होते. यानंतर कोडवर्ड मध्ये संवाद साधून ते अत्याचार करत होते. मांत्रिकाला डॉक्टर, मुलींना रस्सी या नावाने हाक मारली जात असे. दरम्यान, या टोळीला बळी पडलेल्या मुलींनी न घाबरता पोलिसांना तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.