मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Crime : प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला, मारहाणीत एकाचा मृत्यू

Thane Crime : प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला, मारहाणीत एकाचा मृत्यू

Mar 31, 2023 01:09 PM IST

Thane Crime : ठाण्यात संपत्तीच्या वादातून पुटण्याने सख्ख्या दोन सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात गंभीर जखमी झाल्याने एका काकाचा मृत्यू झाला आहे.

 crime news
crime news

ठाणे : ठाण्यात गुन्हेगारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादातून एका पुतण्याने दोन सख्ख्या काकांवर जीवघेणा हल्ला केला. यात त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला. तर दुसरे काका गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन चौकात शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली.

ट्रेंडिंग न्यूज

मनवीर मरोठीया असे मृत्यू झालेल्या काकाचे नाव आहे. तर रामपाल मरोठीया हे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी पुतण्या हल्ला केल्यानंतर फरार झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनविर मरोठीया आणि रामपाल मरोठीया आणि त्यांच्या पुतण्यामध्ये संपत्तीवरून वाद होते. या पूर्वीही अनेकदा त्यांच्यात वाद झाले आहे. दरम्यान, आज सकाळी मनविर मरोठीया आणि रामपाल मरोठीया हे बाहेर जात असतांना आरोपी पुतण्याने त्यांच्या जवळ जात त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत मनविर मरोठीया हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर रामपाल हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांचावर ठाण्यातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पुतण्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग