Dombivli crime News : डोंबिवलीत एक १९ वर्षीय तरुणीवर तिच्या दोन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा भागात ही घटना घडली. ही तरुणी एका तरुणाबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये रहात होती. रविवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणातील दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड आणि दोन्ही आरोपींची ओळख आहे. दोघांनी तरुणीच्या मित्राला दारू आणण्यास पाठवून घरात एकट्या तरुणीला पाहून तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत लिव्ह इन मध्ये राहते. ती आई-वडिलांपासून विभक्त रहात होती. पीडितेने घरातील सामान बांधून ते ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. रविवारी संध्याकाळी सामानाची बांधबंदिस्ती आणि आता सामान कधी इतरत्र हलविणार याची चौकशी करण्यासाठी पीडितेचा मित्र दिनेश गडारी आणि सुनील राठोड पीडित तरुणीच्या घरी आले. त्यावेळी पीडित तरुणीचा मित्र आणि पीडित तरुणी घरात होते.
पीडित तरुणी आणि तिचा मित्र अन्य भागात स्थलांतरित होणार आहेत. त्यापूर्वी पार्टी करण्यासाठी आरोपी दिनेश, सुनील यांनी पीडितेच्या मित्राला दारू आणण्यास सांगितले. तो दारू आणण्यासाठी घराबाहेर पडताच, पीडिता घरात एकटीच आहे ही संधी साधून दिनेशने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. दिनेशशी प्रतिकार करुन तरुणी घराबाहेर येऊन बचावासाठी पळू लागली. सुनीलने तरुणीचा पाठलाग करुन तिला पकडले. तिला एका रिक्षेत जबरदस्तीने बसवून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरुन विष्णुनगर पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या