Thane Man Rapes Dog: भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; ठाण्यातील धक्कादायक घटना, अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Man Rapes Dog: भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; ठाण्यातील धक्कादायक घटना, अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

Thane Man Rapes Dog: भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; ठाण्यातील धक्कादायक घटना, अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

Jul 04, 2024 03:58 PM IST

Thane Stray Dog Rape News: ठाण्यात भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाण्यात भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार
ठाण्यात भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

Thane Samata Nagar Stray Dog News: ठाण्यातील वर्तक नगर परिसरात भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. सुप्रिया चाळके (वय, ३७) असे पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेल्या महिलेचे नाव आहे. संबंधित महिला श्वानप्रेमी असून एका ठिकाणी मोलकरीण आहे. सुप्रिया या काम संपल्यानंतर संध्याकाळी समता नगर परिसरातील भटक्या कुत्र्यांना खायला घालते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया या समता नगर येथील रामेश्वर भवनासमोरील राणी नावाच्या भटक्या कुत्रीची काळजी घेते. राणीने अलीकडेच पिल्लांना जन्म दिला. दरम्यान, २७ जून २०२४ तिने रामेश्वर बिल्डिंगमध्ये जाऊन राणीला हाक मारली. पण ती आली नाही. त्यानंतर तिने स्थानिक लोकांकडे चौकशी केली. काही वेळाने तिने राणीला आवाज दिल्यानंतर राणी प्रचंड रक्तस्त्रावसह तिच्याकडे धावत आली. याबाबत सुप्रियाने चौकशी केली असता एका वॉचमनने उघड केले की, त्याला बाथरूममधून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याने दरवाजा ठोठावला, तेव्हा एक व्यक्ती बाहेर आला. बाथरूम रक्ताने माखले होते. त्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला. सुप्रिया यांनी राणी स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, किकबॉक्सिंग ट्रेनरला अटक

मुंबईतील भायखळा परिसरात १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २२ वर्षीय किकबॉक्सिंग ट्रेनरला अटक करण्यात आली. आरोपीने गेल्या चार महिन्यात अनेक वेळा पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडता भायखळ्यातील एका रहिवाशी सोसायटीत राहत होती, जिथे तिला किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले जात होते. सोसायटीच्या इमारतीशिवाय ती इतर विद्यार्थ्यांसोबत स्टुडिओमध्येही सरावासाठी जात असे. ट्रेनरने पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात पीडितेवर अत्याचार केले. पीडिताने सांगितले की, आरोपीने अनेकदा तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली.मात्र, पीडिताने नकार देऊनही आरोपी सतत तिला विचारत होता. पण एकदा आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करून अत्याचार केला. पहिल्यांदा स्टुडिओच्या आत अत्याचार झाला. त्यानतर मुलीच्या इमारतीच्या आवारात, असे चार वेळा पीडितेवर अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. पीडिताने हा प्रकार अनेक दिवस आपल्या पालकांपासून लपवून ठेवला. मात्र, रविवारी तिने आपल्या सोबत घडलेला प्रकार तिच्या आईच्या कानावर घातला. यानंतर पीडिताच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर