Thane Crime : आज काल सोशल मिडियामुळे जग जवळ आलं आहे. फेसबूक, ट्विटर सारख्या विविध सोशल मीडियावरुन आता फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. ठाण्यातील उल्हासनगर येथे अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणी सोबत फेसबूकवरून ओळखी करत, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल करत लग्न केलं. यानंतर माहेरुन पैसे आणण्यासाठी तिच्या छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीवर बलात्काराचा तर सासरच्या मंडळीवर देखील शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २७ वर्षीय तरुणीची एका तरुणासोबत फेसबूकवरून मैत्री झाली. या मैत्रीतून दोघांची जवळीक वाढून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या. यातून शारीरिक जवळीक देखील वाढली. या खासगी क्षणाचा प्रियकराने व्हिडिओ काढला. या ठिकाणी तरुणीचा घात झाला. हा व्हिडिओ दाखवून प्रियकराने ब्लॅकमेल करत जबरदस्तीने मुलीशी लग्न केले. लग्न झाल्यावर तरुणीच्या अडचणी आणखी वाढल्या. तिचा पैशांसाठी पती छळ करू लागला. तिने माहेरून पैसे आणावे अशी मागणी करत तिच्या शरीरावर सिगरेटचे चटके देण्यात आले. तसेच सासरच्या मंडळींने देखील तिचा छळ केला.
लग्नानंतरही अत्याचाराच वाढत गेला. तरुणीला माहेरून पैसे आणण्यासाठी मुलाच्या घरच्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुरवातीला तरुणीने काही मागण्या पूर्ण केल्या. मात्र, आणखी पैशांची मागणी करत तिचा छळ सुरूच ठेवण्यात आला. हा छळ असह्य झाल्याने या तरुणीने थेट पोलिसांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे तिने थेट न्यायालयात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार कोर्टाने पती व सासरच्या मंडळींविरोधात बलात्कार, मारहाण, शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी या तरुणीचा गुन्हा दाखल करून घेत पतीला अटक केली.
संबंधित बातम्या