Thane Water Supply News : ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या गुरुवारी कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. एमआयडीसी पाणी पुरवठा योजनेच्याच्या कटाई नाका ते मुकुंद परिसरापर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने हा पाणी पुरवठाहा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका परिसरात चार स्त्रोतामार्फत पाणी पुरवठा केला जातो. रोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा शहराला करण्यात येतो. यात प्रामुख्याने एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण, मुंबई महापालिका व महापालिकेची स्वत:ची योजना या चार पाणी योजनांचा समावेश आहे. एमआयडीसी अंतर्गत शहराला १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा केला जातो. या योजनेमार्फत प्रामुख्याने मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे इस्टेटमधील काही भागात पाणी पुरवठा हा केला जातो. मात्र, या योजनेच्या बारवी गुरूत्व वाहिनीवरील कटाई नाका ते मुकुंद परिसरापर्यंतच्या जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार २७ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यत असा २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
पाइप लाइन दुरुस्तीच्या या कामामुळे दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ आणि ३१ चा काही भाग वगळता ) व कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा हा २४ तास पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. यानंतर काही वेळाने पाणी पुरवठा हा सुरळीत केला जाणार आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन पाणी साठा करून ठेवावा असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या