मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane: ठाण्यातील मासुंदा तलावात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ

Thane: ठाण्यातील मासुंदा तलावात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 12, 2023 04:05 PM IST

Woman Died Body Found In Thane: ठाण्यातील मासुंदा तलावात आज सकाळी एका वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

Thane Crime
Thane Crime

Thane News: ठाण्यातील मासुंदा तलावात मंगळवारी (१२ सप्टेंबर २०२३) सकाळी एका महिलेचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. या घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मासुंदा तलावात एका महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याची माहिती मिळाली. यानंतर बचाव पथकाने महिलेचा मृतदेह तलावातून बाहेर काढून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होईल.

सदर वयोवृद्ध महिला ही अंदाजे ६५ ते ७० वयोगटातील असून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ठाण्यातील मासुंदा तलावजवळ संध्याकाळी लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या तलावाच्या शेजारी मोठी बाजारपेठ आणि भाजी मार्केट आहे. यामुळे मासुंदा तलाव हा नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, तरीही ही महिला पाण्यात पडली कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

पुणे: दाजीचा हत्या करून मेहुण्याची आत्महत्या

पुण्यातील बाणेर परिसरात दाजीची हत्या करून मेहुण्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (१२ सप्टेंबर) उघडकीस आली. धनंजय साडेकर (वय, ३८) असे खून झालेल्या दाजीचे नाव आहे. तर, हेमंत काजळे (वय, ४०) असे गळफास घेऊन आत्महत्या करण्याऱ्या मेहुण्याचे नाव आहे. ही घटना बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटी मधील फ्लॅट नं. २०१ येथे घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

WhatsApp channel