मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhiwandi Accident : दुचाकीस्वाराला वाचवताना रिक्षा दुभाजकावर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू, अपघात CCTV मध्ये कैद

Bhiwandi Accident : दुचाकीस्वाराला वाचवताना रिक्षा दुभाजकावर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू, अपघात CCTV मध्ये कैद

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 09, 2024 08:06 PM IST

Bhiwandi accident : भिवंडीत प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत.

भिवंडीत रिक्षा दुभाजकावर आदळली
भिवंडीत रिक्षा दुभाजकावर आदळली

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एक भीषण अपघात झाला आहे. आज (शनिवार) सकाळच्या सुमारास एक ऑटो रिक्षा दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्ये उभा असतो. त्यावेळी भरधाव वेगाने येणारी रिक्षा दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बाजुला जाऊन दुभाजकावर धडकते. दुचाकीस्वार जर १ सेकंद जरी पुढे गेला असता तर त्याच्याही जीवावर बेतलं असतं. बाईकस्वार समोरून रिक्षा येताना थांबला, मात्र समोरुन भरधाव आलेल्या रिक्षाचा वेग खूप असल्यानं चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं आणि ती थेट डिव्हायडरवर आदळली. 

अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे भिवंडी शहरात खळबळ उडाली आहे.

भरधाव क्रेटा हॉटेलात घुसली -

लातूर-सोलावूर महामार्ग क्रमांक ३६१ वर औसा येथे सीएनजी पेट्रोल पंपाजवळ भरधाव क्रेटा कार हॉटेलात घुसली. या अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला असून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाचं आयुष्य बरबाद झाले आहे. या अपघातात त्याने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. ओकांर कांबळे असे या मुलाचे नाव आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. क्रेटा कार हैदराबादहून लातूरकडे जात होती. भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट हॉटेलमध्ये घुसली.

IPL_Entry_Point