Thane ST Bus Accident News: ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मेट्रोच्या खांबाला धडक दिली. या अपघातात ११ प्रवासी जणखी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री घोडबंदर रोडवरील ओवळा सिग्नलजवळ हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. परंतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. या घटनेत जखमी झालेल्या ११ प्रवाशांना वेदांत, रामानंद आणि टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. एसटी बस मेट्रोच्या खांबाला धडकल्यामुळे बसच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
ठाण्याच्या घोणबंदर रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले असून बुधवारी पहाटे रस्त्यावर ट्रकला अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे ठाणे आणि मुंबईला जाणारे विद्यार्थ्यांसह हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले होते. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही घोबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला.
मुंबईतील लोअर परळ येथे रविवारी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
लोअर परळ येथील मातुली नाक्याजवळ उजवीकडे वळण घेत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत आयुष सिंह, शिवह सिंह (वय, २२) आणि विशाल सिंह (वय, २१) यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी त्यांना तातडीने नायर रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी आयुष सिंगला मृत घोषित केले. इतर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एन.एम. जोशी पोलिसांनी कारचालक मनीष सिंह (वय, २५) याला कुर्ला येथून अटक केली.