शिवसेना ठाकरे गटानंतर आता मुंबईमध्ये काँग्रेसला देखील खिंडार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत काँग्रेला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटातील माजी आमदारासह काँग्रेसच्या सहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आठ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रमुख बाबू खान, ज्योती परमार (समाजवादी पार्टी) यांचा समावेश आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम काटे आणि त्यांच्या पत्नी अनघा यांनीही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात तुकाराम काटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुढच्या आठवड्यात मुंबईत इंडियाची बैठक होणार आहे. त्यामुळे काँग्रेसची पडझ़ड थांबवण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आपले राजीनामे सोपावले आहेत.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार तुकाराम काते तसेच मुंबईतील ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगरसेविका यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
ठाकरे गटाला सोडल्यानंतर तुकाराम काते म्हणाले, माझी चेंबूर मध्ये एक शाळा आहे. जी पडायला आली आहे. त्या शाळेत ४ हजार विद्यार्थी आहेत. या शाळेचं काम करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.
काटे म्हणाले की, चेंबूरमधील पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. मात्र येथून जाणाऱ्या मेट्रोची उंची ही पुतळ्यापेक्षा मोठी आहे. मला उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. मात्र मला सांगण्यात आले की, तुम्ही कोविड टेस्ट करुन या. मी सर्व केले पण मला अजूनपर्यंत भेट मिळाली नाही. हा महाराजांचा अपमान आहे. या शिवसेनेत मी आधीसारखं काम करेल, असे ते पुढे म्हणाले.
पुष्पा कोळी (काँग्रेस) सायन कोळीवाडा.
कुनाल माने (काँग्रेस) धारावी
गंगा माने (काँग्रेस) धारावी
बाबू खान (काँग्रेस) धारावी
भास्कर शेट्टी (काँग्रेस) धारावी
वाजिद कुरेशी (काँग्रेस) चांदिवली
ज्योत्सना परमार (समाजवादी पक्ष)
समृद्धी काटे (शिवसेना ठाकरे गट) अनुशक्तीनगर.
माजी आमदार तुकाराम काटे (शिवसेना UBT) अनुशक्तीनगर.