मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  TET Scam : पुणे जिल्ह्यातील 'त्या' शिक्षकांच्या कागदपत्रांची होणार तपासणी; तीन दिवस चालणार मोहीम

TET Scam : पुणे जिल्ह्यातील 'त्या' शिक्षकांच्या कागदपत्रांची होणार तपासणी; तीन दिवस चालणार मोहीम

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 03, 2022 04:13 PM IST

Pune TET Scam : राज्यात टीईटी घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. सध्या सेवेत असलेल्या तब्बल ८ हजार बोगस शिकांची यादी राज्य परीक्षा विभागाने जाहीर केली होती. पुणे जिल्ह्यातील यादी देखील प्राप्त झाली असून या शिक्षकांच्या कागद पत्रांची तपासणी केली आहे.

टीईटी घोटाळा
टीईटी घोटाळा

पुणे : कोट्यवधींच्या टीईटी घोटाळा उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घोटाळ्यात अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून ही परीक्षा पास करत नोकरी मिळवली होती. राज्य परीक्षा विभागाने तब्बल ८ हजार विद्यार्थ्याची यादी प्रसिद्ध केली होती. यातील पुण्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवक, उपशिक्षक असणाऱ्या तब्बल १७० शिक्षकांची यादी शिक्षण विभागाला मिळाली असून सोमवार पासून या शिक्षकांच्या कागद पत्रांची तपासणी पुणे जिल्हा परिषदेत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी हिदूस्थान टाईम्स मराठीला दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आपल्या संकेतस्थळावर तब्बल ८ हजार परीक्षार्थींची यादी प्रसिद्ध करून त्यांची संपादणूक रद्द करण्यासाठी यापुढे त्यांना ही परीक्षा कधीच देता येणार नाही, अशी कारवाई केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा पुणे शहर पोलिसांनी वर्ष २०२१ मध्ये उघडकीस आणला होता. आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करताना त्यांनी टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची माहिती मिळाली. त्यानंतर वर्ष २०१९ च्या टीईटी घोटाळ्याची चौकशी करतानाच वर्ष २०१८ मधील टीईटीही गैरप्रकार झाल्याचे आढळून आले.

राज्य परीक्षा परिषदेने पुणे जिल्ह्यातील १७० जणांची यादी ही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिली आहे. शिक्षण विभागातर्फे सोमवार पासून या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. सोमवारी (दि ५) यादीतील क्रमांकानुसार १ ते ६० शिक्षकांच्या कागद पत्रांची तपासणी केली जाणार आहे. यात नियुक्ती आदेश छायांकित प्रत आणि टीईटी उत्तीर्ण मुळ प्रमाण पत्रांची तपासणी केली जाणार आहे. मंगळवारी (दि ६) रोजी ६१ ते १२१ क्रमांक असणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तर बुधवारी १२१ ते १७० क्रमांक असणाऱ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार आहे. यात दोशी असणाऱ्यांवर शासकीय नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, यादीत नावे असणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात उपस्थित राहण्या संदर्भात गट शिक्षणाधीकाऱ्यांनी सूचित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वर्ष २०१९ मध्ये झालेल्या टीईटीतील घोटाळ्यात अडकलेल्या साडेसात हजारांवर उमेदवारांचीदेखील परीक्षा परिषदेने संपादणूक रद्द करून त्यांना या परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले होते. तसेच त्यातील वेतन सुरू असलेल्या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवून वेतन बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशाला संबंधित परीक्षार्थींनी न्यायालयात आव्हान दिले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या