Nalasopara Murder : राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि मुंबईत किरकोळ कारणावरून हत्या करण्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत उघड झाले आहे. अशीच एक घटना मुंबईतील नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. गहाण ठेवलेल्या गाडीचे पैसे जुगारात हरल्याने एकाने पैशांसाठी ठेकेदाराचीच हत्या केल्याची घटना उघकडीस आली आहे. ही घटना पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
प्रमोद कुमार उर्फ कत्तवारू गोविंद बिंद असे हत्या झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील असलेला व नालासोपाऱ्यात स्थायीक झालेल्या प्रमोदची हत्या ही २४ ऑगस्टल अकरण्यात आली होती. समीर कुमार बिंद असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडे कोणताही पुरावा किंवा धागेदोरे नव्हते. मात्र, योग्य पद्धतीने तपसाची दिशा पुढे नेत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खून प्रकरणी तपास करत असतांना पोलिसांना अनेक अडचणी आल्या. पुरावे मिळत नव्हते. दरम्यान, हत्या झालेल्या प्रमोद कुमारच्या नातेवाईकांनी त्यांच्या गावातील काही जणांवर शंका घेतली होती. पेल्हार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मात्र, तो आरोपी नसल्यानं पोलिसांनी खोलात जाऊन तपासणी केली. यावेळी त्यांना प्रमोदच्या पूर्वीच्या कामगाराची माहिती मिळाली. समीर कुमार समशेर बच्छालाल बिंद असे त्याचे नाव असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा फोन बंद येत होता. आरोपीने त्याचा फोन गुजरातमध्ये जाऊन बंद केला. त्याचा शोध घेण्यासाठी मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने तांत्रिक विश्लेषणाद्वारे सापळा रचत उत्तर प्रदेशमधून समीर कुमार बिंदला अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली.
समीरने त्याची गाडी ही गहाण ठेवली होती. यानंतर तो मुंबईला आला होता. मुंबईमध्ये आल्यानंतर समीरने त्या पैशांचा जुगार खेळला. मात्र, हे सर्व पैसे तो जुगरात हरला. त्यामुळे हारलेले पैसे पुन्हा कसे मिळवायचे या विवंचनेत होत होता. तो प्रमोद कुमारच्या घरी आला. या ठिकाणी दोघांनी अंडा राईस खाल्ला. यानंतर दोघं झोपले. दरम्यान, प्रमोदकडे पैसे असल्याचं समीरला माहिती होत. त्यामुळे त्याने त्याचा पूर्वीचा मालक ठेकेदार प्रमोदची हत्या केली व प्रमोद कडे असलेले २६ हजार रुपये घेऊन फरार झाला.
संबंधित बातम्या