मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  samruddhi mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर कारची अवजड वाहनाला धडक, तिघे जागीच ठार, दौलताबाद येथील घटना

samruddhi mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर कारची अवजड वाहनाला धडक, तिघे जागीच ठार, दौलताबाद येथील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 11, 2024 09:11 AM IST

samruddhi mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर शनिवारी रात्री औरंगाबादच्या दौलताबाद जवळ झालेल्या भीषण अपघातात तिघेत ठार झाले.

samruddhi mahamarg Accident
samruddhi mahamarg Accident

samruddhi mahamarg Accident near daultaabad : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे, सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री अहमदनगर येथे झालेल्या अपघातात तिघे जण ठार झाले होते. ही घटना ताजी असतांना शनिवारी रात्री ११ च्या सुमारास छत्रपती संभाजी नगरच्या दौलताबाद येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका भरधाव कारने समोर आलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात गाडीचा चक्काचूर झाला.

Maharashtra weather update: राज्यात विदर्भ, मराठवाड्याला आज बसणार अवकाळी पावसाचा तडाखा! असा आहे हवामानाचा अंदाज

राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात आणि अण्णा रामराव मालोदे अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. ते सर्व छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. भरधाव कारने अवजड वाहनाला पाठिमागून जोरदार धडक दिली. संभाजीनगर येथील रहिवाशी असलेले राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात हे तिघे कारने शनिवारी रात्री ११ च्या सुमारास समृद्धी महामार्गाने जात होते. त्यांची कार ही दौलताबाद येथे आली असता, भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ही समोर असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता एकी कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यात राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात आणि अण्णा रामराव मालोदे हे तिघेही जागीच ठार झाले.

Pakisthan Election : पाकिस्तानात स्थापन होणार त्रिशंकु सरकार! शाहबाज यांनी घेतली झरदारींची भेट, बिलावल भुट्टोशीही चर्चा

शुक्रवारी रात्री देखील नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात समृद्धी महामार्गांवर स्विफ्ट डिझायर कार व कंटेनरच्या अपघातात तीन जण ठार, तर दोन जर जखमी झाले होते. ही घटना देखील रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठने (तिघेही राहणार जाफराबाद जिल्हा जालना) ठार झाले होते.

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत समृद्धी महामार्गावर एक कंटेनर उभा असताना त्यातील चैनल खाली पडलेला होता, हा चॅनले कंटेनर चालक उचलत असताना जालन्याकडून शिर्डी कडे स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने येत होती. स्विफ्ट डिझायर कार चालकाचां कारवरील ताबा सुटल्याने समोर असलेला कंटेनर चालकाला धडक देत कार समोरील कंटेनर वर जाऊन आदळली. या अपघातात वरील तीन जणांनाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

WhatsApp channel