आषाढी एकादशीला पंढरीनाथाचे दर्शन घेऊन पंढरपूरहून आपल्या घरी परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला.जालना राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एक जीप रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. वारकरी पंढरपूरवरून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. स्थानिक नागरिकांना तत्काळ बचावकार्य सुरू करत सहा जणांना वाचवले. हीघटना गुरूवारी सायंकाळच्या सुमारास जालना-राजूर मार्गावरील वसंतनगर शिवारात घडली.
समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.
पंढरपूरहून आषाढी वारी करून काही वारकरी जालनामार्गे जीपमध्ये बसून राजूरकडे जात होते. भरधाव वेगातील जीप वसंतनगर शिवारात आली असता समोरून आडवी आलेल्या मोटारसायकलली चुकवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. मोठा आवाज झाल्याने शेतात काम करणारे शेतकरी व कामगारांनी तातडीने विहिरीकडे धाव घेत विहिरीत पडलेल्या वारकऱ्यांना बाहेर काढायला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत बचावमोहीम सुरू होती. सहा जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिस अधिकारी, अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले आहेत.
अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. विहिरीतून गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आलेल्या काही वारकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान जीपमधून नेमके किती जण प्रवास करत होते,याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
आषाढी वारी निमित्त डोंबिवली येथून काही वारकरी हे एका ट्रॅव्हल बसने पंढरपूरला निघाले होते. या बसमध्ये ५४ प्रवासी होते. गाडीत विठ्ठलाच्या नामघोषात सुरू होता. मात्र, अचानक एक ट्रॅक्टर वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल बसला धडकला. हा अपघात ऐवढा भीषण होता की यात पाच जण जागीच ठार झाले तर २० ते २५ जण जखमी झले आहेत. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या