Jalgaon ST Accident : जळगाव येथे धुळे ते बऱ्हाणपूर बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत बसचा चक्काचूर झाला आहे. भरधाव कंटेनरने बसला कट मारल्याने हा भीषण अपघात झाला असून यात १० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या बस मध्ये तब्बल ४९ प्रवासी प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव येथील विवरा गावाजवळ ही घटना घडली ही घटना घडली. धुळे ते बऱ्हाणपूर बस ही तिच्या प्रवासाठी जळगाव येथून निघाली होती. ही बस महामार्गावरून जात असतांना एका भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने या बसला जोरदार कट मारला. ही धडक एवढी भीषण होती की यामुळे बसचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. तब्बल ४९ प्रवासी या बस मधून प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणती जिवत हानी झाल्याची माहिती नाही. दरम्यान जखमी प्रवाशांपैकी काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच काही नागरिक हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. दरम्यान, नागरिकांनी बसमधून जखमी नागरिकांना बाहेर काढत त्यांना तातडीने दवाखान्यात उपचारसाठी दाखल केले.
या घटनेनंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान काही वेळाने पोलिस देखील या ठिकाणी आले. त्यांनी देखील जखमी नागरिकांना बाहेर काढत उपचारासाठी दवाखान्यात पाठवले. दरम्यान पोलिसांनी अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला घेत येथील वाहतूक ही सुरळीत केली.
संबंधित बातम्या