मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Accident in Yavatmal: यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 06, 2024 09:59 AM IST

Accident in Yavatmal: यवतमाळ येथे एका दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या करणे धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही कार कार आर्णि येथील तहसीलदाराची असल्याची माहिती आहे.

यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार
यवतमाळमध्ये भीषण अपघात, तहसीलदाराच्या कारची दुचाकीला धडक, दोघे ठार; गाडीचा चालक फरार

Yavatmal Accident यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. दिवसभराचे काम संपवून घरी जाणाऱ्या दोन तरुणांवर काळाने घाला घातला आहे. एका भरधाव वेगात असलेल्या एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही कार आर्णि येथील तहसीलदारांची असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. अपघातानंतर वाहनचालक मदत न करता घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

WhatsApp News : व्हॉट्सॲपचं रंग, रूप बदललं! नव्या बटणांनी दिला आकर्षक लुक, तुम्ही पाहिला का?

अंकुश देवराव भोजने (वय २५, रा. रामगाव), तोरनाळा येथील श्रीकांत प्रमोद ठाकरे (वय २४) असे मृत तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण बोरी अरब येथून काम आटपून दुचाकीने दारव्हा येथे घरी जात असतांना मोटारीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

Viral News : मुलींच्या घामापासून तयार होतो भात! खवय्ये आवडीने मारतात ताव! कुठे मिळते ही विचित्र डिश? वाचा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण हे दारव्हा येथील रहिवासी आहेत. ते त्यांचे काम संपवून घरी परत जात होते. यावेळी वेगात असलेल्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही घटना दारव्हा जवळ असणाऱ्या एका देवस्थानाजवळ रविवारी रात्री घडली. या अपघातात एकाचा घटनास्थळी तर दुसर्‍याचा दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.अपघात झाल्यावर कारचालक फरार झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला असून कारच्या क्रमांकावरुन कार मालकाची माहिती मिळवली आहे. तपासात ही कार आर्णि येथील तहसिलदाराची असल्याची माहिती समोर अली आहे.

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

कारचालकाविरुद्ध गुन्हा

पोलिस तपासात ही कार आर्णि येथील तहसीलदार परसराम भोसले यांची असल्याची माहिती पुढे आली आहे. वाहनचालक हा घटनास्थळावरुन पसार झाला असून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कार कोण चालवत होते? याचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.

IPL_Entry_Point