Kolhapur Accident : कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, भीषण अपघातात ३ जण जागीच ठार-terrible accident in tavandi ghat of kolhapur container collided with 7 vehicles 3 people died on the spot ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Accident : कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Kolhapur Accident : कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Sep 16, 2024 06:46 AM IST

Kolhapur tavandi ghat Accident : कोल्हापुरात एक भीषण अपघात झाला आहे. येथील निपाणी जवळ असलेल्या तवंदी घाटात एका कंटेनरने ७ वाहनांना धडक दिली असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, भीषण अपघातात ३ जण जागीच ठार
कोल्हापूरच्या तवंदी घाटात कंटेनरची ७ वाहनांना धडक, भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Kolhapur tavandi ghat Accident : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. धुळे येथील अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना ताजी असतांना कोल्हापुरात पुन्हा भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या सुमारास कोल्हापुरच्या निपाणी जवळील तवंदी घाटात हा भीषण अपघात झाला असून एका भरधाव कंटेनरने ७ ते ८ वाहनांना धडक दिली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले तर, ६ जण गंभीर जखमी आहेत. हा कंटेनर बेळगावहून कोल्हापूरला जात होता. या घटनेत वाहनांचा चक्काचूर झाला आहे. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.

रात्रीच्या सुमारास एक कंटेनर बेळगाववरून कोल्हापूरला जात होता. यावेळी कंटेनरचा वेग हा जास्त होता. हा कंटेकर निपाणी जवळील तवंदी घाटात आला असता यावेळी अचानक चलकांचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. यामुळे रस्त्यावरील इतर ७ ते ८ वाहनांना या ट्रकने धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने ३ कार, २ लॉरी, १ कंटेनर व काही दुचाकी गाड्यांना धडक दिली. या घटनेत या वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकीस्वार आणि कार मधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना निपाणी मधील रुग्णालयात दाखल कानरयात आले असून उपचार केले जात आहेत. कंटेनर वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आहे.

या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच जखमी नागरिकांना दवाखान्यात भरती करण्यात आले. हा अपघात नेमका कसा झाला. यात दोषी कोण ? याचा शोध पोलिस घेत आहेत.

धुळ्यात अपघातात पाच जागीच ठार

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. तर चौघे जण गंभीर जखमी झालेत. एका पिकअप चालक दारुच्या नशेत काही वाहतांना धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. यात पाच जण जागीच ठार झाले.

Whats_app_banner