नाशिकमध्ये आयशर ट्रक व पिकअप व्हॅनची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलाजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास हाअपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून १० हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. अपघातस्थळावरचे दृष्य खूपच भीषण असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी दाव घेतली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले. अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, यश खरात आणि दर्शन घरटे (रा. सह्याद्रीनगर, अंबड, नाशिक) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. जखमींची संख्याही जास्त असून जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात झाला.लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला जीपने पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप व्हॅनचा पार चक्काचूर झाला असून चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातानंतर उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतूक सुरुळीत करण्याचा प्रयत्न केला.
नाशिक-मुंबई मार्गावर वाहनांच्या जवळपास चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. १ तास वाहतूक ठप्प असल्याने लोक अडकून पडले.
संबंधित बातम्या