मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sheikh Salla Dargah : कसबा पेठेतील बहुचर्चित शेख सल्ला दर्ग्यावर रात्री कारवाईच्या अफवेने तणाव! पोलिसांचा चोख बंदोबस्त

Sheikh Salla Dargah : कसबा पेठेतील बहुचर्चित शेख सल्ला दर्ग्यावर रात्री कारवाईच्या अफवेने तणाव! पोलिसांचा चोख बंदोबस्त

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 09, 2024 09:46 AM IST

Pune Sheikh Salla Dargah : कसबा पेठेतील प्रार्थनास्थळाच्या बांधकामावर कारवाई करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्री (Pune kasaba peth) या भागात मोठा जमाव एकत्र आला.

कसबा पेठ येथील बहुचर्चित शेख सल्ला दर्ग्यावर रात्री कारवाईच्या अफवेने तणाव
कसबा पेठ येथील बहुचर्चित शेख सल्ला दर्ग्यावर रात्री कारवाईच्या अफवेने तणाव

Pune Sheikh Salla Dargah : पुण्यातील कसबा पेठेतील प्रार्थनास्थळाच्या बांधकामावर कारवाई करण्यात येणार असल्याची अफवा पसरल्याने या ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री मोठा जमाव एकत्र आला. मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आल्याने परिस्थिती तनावाची झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपयुक्त संदीपसिंह गिल आणि पोलिसांची कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांची समजूत काढल्यावर जमलेले नागरिक घरी परतले. दर्ग्यावर कोणतीही कारवाई होणार नसून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

कसबा पेठ येथील बहु चर्चित असलेली शेख सल्ला दर्गा येथे रात्री कारवाई होणार अशी अफवा पसरली होती. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. यमुळे ही कारवाई होणार असा सजम स्थानिक नागरिकांचा झाला. यमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक दर्ग्या पुढे आणि कुंभारवडा परिसरात जमले होते. अचानक जमलेल्या नागरिकांनी घोषणा बाजी देखील सुरू केली होती. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी भर गर्दीत गाडीवर चढून जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. या प्रकारची कोणतीही कारवाई होणार नसल्याचे गिल यांनी सांगितले.

Pune Mhada Lottery : पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ४,७७७ घरांसाठी सोडत जाहीर, असा करा अर्ज?

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त अमितेश कुमार देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल आणि उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या संदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात रात्री बैठक सुरू होती. यानंतर सर्वांची समजूत काढल्यावर नागरिक माघारी परतले.

या संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, परिस्थिति नियंत्रणात आहे. या ठिकाणी कारवाई होण्याची अफवा पसरली होती. मात्र, अशा प्रकारची कोणतीही कारवाई होणार होणार नाही. या संदर्भात आज पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील या साठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु कोणी जर कायदा हातात घेतला तर आम्ही योग्य ती कारवाई करू. दरम्यान, सर्व धर्मियांना माझे आव्हान आहे की त्यांनी शांतता राखावी. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे देखील त्यांनी म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग