Pune vadgaon sheri News : पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील गणेशनगरमध्ये घरासमोर खेळत असतांना अचानक विजेचा शॉक लागल्याने एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री ९ च्या सुमारास घडली. मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहित वेदकुमार चावरा (वय १०, गल्ली क्रमांक ९, गणेशनगर, वडगाव शेरी) असे विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या मृत मुलाचे नाव आहे.
या घटनेचे वृत्त असे की, मोहित चावरा हा बुधवारी (दि. १२) रात्री नऊच्या सुमारास त्याच्या घराजवळ मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी खेळत असतांना त्याचा हात अर्थिगच्या वायरला लागला. या वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यामुळे तो जागेवर कोसळला. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली. घरच्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.
मोहितचे वडील हे व्यावसायिक आहेत. मोहित हा एका शाळेत चौथीत होता. चावरा कुटुंबीय मूळचे गुजरातचे आहे. ते व्यवसायानिमित्त वडगाव शेरी भागात काही वर्षांपूर्वी स्थायिक झाले होते.
या घटनेची माहिती कळल्यावर महावितरणचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अर्थिगच्या वायरमध्ये वीज प्रवाह उतरल्याने शॉक लागून ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
पुण्यातील औंध भागातील परिहार चौकात पहाटे फिरायला गेलेल्या समीर राय चौधरी (वय ७७) यांच्यावर चोरट्यांनी गुरुवारी हल्ला केला होता. चोरट्यांनी नशेसाठी त्यांच्या कडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी चौधरी यांच्या डोक्यात गज मारला. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असतांना डॉक्टरांनी चौधरी यांना ब्रेनडेड घोषित केले होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी औंधमधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चोरट्यांनी चौधरी यांच्यासह तिघांवर हल्ला केला होता. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी चोरट्यासह त्याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या