मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Mulshi Accident : पुण्यातील पिरंगुट इथं भरधाव टेम्पोनं अनेकांना उडवलं! थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Pune Mulshi Accident : पुण्यातील पिरंगुट इथं भरधाव टेम्पोनं अनेकांना उडवलं! थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Nov 21, 2023 11:13 AM IST

Pune Mulshi pirangut Accident : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव टेम्पोने चार ते पाच वाहनांना धडक दिली आहे.

Pune Mulshi Accident
Pune Mulshi Accident

Pune Mulshi Accident : पुण्यात पिरंगुट येथे भीषण अपघात झाला आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ पुढे आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एका भरधाव टेम्पोने चार ते पाच वाहनांना उडवले आहे. या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुळशी तालुक्यातील पीरंगुट येथे पुणे कोलाड मार्गावर घडली. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील मुळशी तालुक्यातील कोलाड पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात हा भीषण अपघात झाला. या मार्गावरील एका उतारावर भरधाव वेगात असलेल्या टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने त्याने या मार्गावरील अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत पाच ते सहा नागरीक गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

Delhi accident: रॅश ड्रायव्हिंग करणे महिलेला भोवले! दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महाराष्ट्रातील चौघे घटनेत जखमी

या भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने पाच दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिली. हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पिरंगुट घाटात गेल्या काही दिवसांपासूंन अपघाताची मालिका सुरूच आहे. या मार्गावरील अवजड वाहनांवर कारवाई करण्यात यावी या साठी मुळशी तालुक्यातील नागरिकांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांना निवेदन दिले असून या मार्गावर सुरक्षा उपाय योजना करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

WhatsApp channel
विभाग