मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cold Weather : मराठवाड्यासह विदर्भात हाडं गोठवणारी थंडी; मुंबई पुण्यातही तापमान खालावलं

Cold Weather : मराठवाड्यासह विदर्भात हाडं गोठवणारी थंडी; मुंबई पुण्यातही तापमान खालावलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 04, 2023 09:27 AM IST

Mumbai And Pune Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. याशिवाय शहरांमधीलही तापमान खालावत आहे.

marathwada and vidarbha weather forecast
marathwada and vidarbha weather forecast (HT)

marathwada and vidarbha weather forecast : उत्तर भारतातील राज्ये आणि हिमालयातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळं राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान खालावल्यानं लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. याशिवाय अनेक लोकांनी एकत्र येत शेकोट्या पेटवल्या आहे. त्यातच आता येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कडाक्याची थंडी पडल्यानं त्याचा रब्बी पिकांना फायदा होत असल्यानं शेतकरी वर्ग आनंदात आहे. शहरातील लोकांना कडाक्याच्या थंडीमुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती आणि बुलढाण्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबादमध्ये तापमानाचा पारा १० ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ८ ते ११ जानेवारी या काळात विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान आणखी कमी होणार आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर मध्य महाराष्ट्रातील भागांमध्येही थंडीचं प्रमाण वाढण्याची अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नाशिकमध्येही तापमानाचा पारा घसरल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई-पुण्याची स्थिती काय?

महाराष्ट्रातील इतर भागांसह पुणे जिल्ह्यातही तापमानात घट होत असून थंडीचा प्रभाव वाढत आहे. पुण्यातील तापमान १२ अंश सेल्सिअस असून हे तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्याचबरोबर कोकणासह मुंबईतही मोठ्या प्रमाणात थंडीचा प्रभाव जाणवत असून येत्या काही दिवसांत मुंबईसह उपनगरांमध्ये थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं आता शहरातील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

IPL_Entry_Point