मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  T Raja Singh : टोपीवाल्यांकडून मतांची अपेक्षा करू नका; तेलंगणातील आमदाराचं पुण्यात वादग्रस्त वक्तव्य

T Raja Singh : टोपीवाल्यांकडून मतांची अपेक्षा करू नका; तेलंगणातील आमदाराचं पुण्यात वादग्रस्त वक्तव्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 22, 2023 10:10 PM IST

Raja Singh Thakur In Pune City : पुण्यातील जनआक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या तेलंगणातील आमदारानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Raja Sigh Thakur Controversial Statement
Raja Sigh Thakur Controversial Statement (HT)

Raja Sigh Thakur Controversial Statement : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा केल्यानंतर आता भाजपसह हिंदुत्ववादी संघटना त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापूर, यवतमाळनंतर आता पुण्यातही हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मोर्चात भाजप आमदार शिंवेद्रराजे भोसले यांच्यासह तेलंगणातील वाचाळवीर आमदार राजासिंह ठाकूर यांनीही हजेरी लावली. परंतु आमदार ठाकूर यांनी महाराष्ट्रात येऊन गोल टोपीवाल्यांकडून मतांची अपेक्षा करू नका, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं आता त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

तेलंगणातील भाजप आमदार राजासिंह ठाकूर पुण्यात बोलताना म्हणाले की, गोल टोपीवाल्यांकडून मतांची अपेक्षा करू नका, 'जिहादींओं को चून, चून कर मारना है', असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे नेते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. जेव्हा मी महाराष्ट्रात येतो तेव्हा मला हिंदुत्व पाहायला मिळतं, असंही आमदार ठाकूर म्हणाले.

जो धर्मांतर करेल त्याला जमीनीत गाडा- ठाकूर

जो कुणी धर्मांतर करेल त्याला तीन फूट जमीनीत गाडण्याचं वादग्रस्त आवाहन राजासिंह ठाकूर यांनी उपस्थितांना केलं आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू तरुणींना फसवलं जात असून त्याविरोधात देशात कठोर कायदा करण्याची गरज आहे. याशिवाय संपूर्ण देशात गोहत्याबंदी कायदा करावा, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारवर दबाब आणावा लागेल, असंही राजासिंह ठाकूर म्हणालेत. पुण्यात आल्यानंतर आज मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली आहे. आता पुढच्यावेळी मी जेव्हा पुण्यात येईल तेव्हा पुण्यश्वर मंदिरात पूजा करणार असल्याचं ठाकूर म्हणाले.

WhatsApp channel