असदुद्दीन ओवैसी यांच्याAIMIM ला मोठा झटका बसताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या ७ मतदारसंघापैकी केवळ ३ जागांवर या पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. या सात जागांवर एमआयएमचे वर्चस्व होते. मात्र ४ जागांवर पार्टीचे उमेदवार पिछाडीवर पडले आहेत. या सर्व जागा हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व ओवैसी करतात.
हैदराबादमधील ७ जागांमध्ये मलकपेट, कारवां, गोशामहल, चारमीनार, चंद्रयानगुट्टा, याकूतपुरा, बहादुरपुरा आदिंचा समावेश आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने सात जागांवर विजय मिळवला होता. हैदराबादमध्ये एमआयएमचे मजबूत संघटन आहे. मात्र होम ग्राऊंडवरच औवैसींना झटका बसला आहे. दुसरीकडे भाजपने १० जागांवर आघाडीवर घेतली आहे.
तेलंगणात बीआरएस, काँग्रेसनंतर तिसरा फॅक्टर आहेओवैसी फैक्टर. यावेळी खासदार असदुद्दीन ओवैसीयांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM)च्या तिकीटावर ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या ९ पैकी ७ जागा ओवैसी यांच्या मतदारसंघात येतात.
एमआयएमने चारमीनार, बहादुरपुरा, मलकपेट,चंद्रयानगुट्टा, नामपल्ली, याकुतपुरा, कारवां, राजेंदर नगर आणि जुबली हिल्सया ९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी केवळ ४ आघाडीवर आहेत.
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत हैदराबाद लोकसभा मतदारसंघात एआयएमआईएमच्या मतांची टक्केवारी सर्वाधिक होती.असदुद्दीन ओवैसी २००९ पासून हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. २०१८ च्याविधानसभा निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने ११९ पैकी तब्बल ८८ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. तर एमआयएमच्या खात्यात ७ जागा गेल्या होत्या. या जागांमध्ये यावेळी घट होताना दिसत आहे.
संबंधित बातम्या