मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीनं लिहिलेला निबंध आला समोर! नेमकं काय लिहिलं ? वाचा

Pune Porsche case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीनं लिहिलेला निबंध आला समोर! नेमकं काय लिहिलं ? वाचा

Jul 06, 2024 10:20 AM IST

Pune Porsche case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार आरोपीने लिहिलेला निबंध बाल न्याय मंडळाला सादर केला आहे. यात त्याने घटनेचा प्रसंग कथन केला आहे, अशी माहिती किशोर न्याय मंडळाच्या सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सला दिली.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीने सादर केला निबंध! दिली महत्वाची माहिती
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीने सादर केला निबंध! दिली महत्वाची माहिती

Pune Porsche Crash Latest Updates: पुणे पोर्श अपघात प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन बिल्डर धनिक अल्पवयीन मुलाने बाल न्याय मंडळाने सांगितल्यानुसार अपघात प्रकरणावर ३०० शब्दांचा निबंध लिहून कोर्टात सादर केला आहे. या निबंधांत त्याने घटनेचा प्रसंग कथन केला आहे, अशी माहिती किशोर न्याय मंडळाच्या सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सला दिली.

१९ मे रोजी कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत आलीशान पोर्शे कार चालवून आरोपीने अश्विनी कोस्टा व अनिश अवधिया या दोघांना चिरडले होते. यानंतर घडल्यानंतर तातडीने या मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयात हजर केल्यानंतर या मुलाला न्यायाधीशांनी ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून पोलिसांसोबत वाहतूक नियोजनाचे काम करण्याची अट घातली होती. यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तर समाज माध्यमांवर देखील मोठी टीका झाली होती. यानंतर आरोपी मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. मात्र हाय कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आरोपी मुलाला बालसुधारगृहातून सोडण्यात आले आहे. यानंतर या मुलाने ३०० शब्दांचा निबंध लिहित तो बाल न्याय मंडळाकडे सादर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आरोपी मुलाने लिहिलेल्या निबंधांत मुलाने अपघात झालेल्या दिवशीचा घटनाक्रम आणि त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भीतीमुळे त्याला अपघातस्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करावा लागला, असं त्याने लिहिलेल्या निबंधांत लिहिले असल्याचे बाल न्याय मंडळाच्या सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले. भीतीपोटी थेट पोलिसांकडे जाऊन अपघाताची माहिती देण्याऐवजी पादचाऱ्यांनी त्याला पकडण्यापूर्वीच मारहाण करून पळून जाण्यास भाग पाडले, असे देखील त्याने निबंधांत लिहिले आहे.  ‘माझ्याकडून अपघात घडला, अपघात झाल्यानंतर मला पोलिसांची भीती वाटत होती. त्यामुळे मी पळून जाण्याच्या तयारीत होतो. मात्र, लोकांनी मला पडून मारहाण केली.  अपघात झाल्यानंतर पळून जाऊ नका. पोलिसांना शरण या. अपघाताची माहिती द्या. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पोलीस करतील. अपघातग्रस्तांना शक्य तितकी मदत करा. अपघात झाल्यानंतर तुम्ही पळून गेलात तर अडचणीत याल’ असे देखील आरोपीने लिहिलेल्या निबंधांत म्हटलं आहे. 

१८ व्या वाढदिवसाला तीन महिने शिल्लक असताना अल्पवयीन आरोपी मुलाने १२ वी पास झाल्याच्या आनंदात मित्रांसोबत दारू पार्टी केली. यानंतर दारूच्या नशेत वडिलांची नोंदणी नसलेली आलीशान पोर्श गाडी त्याने भरधाव वेगात चालवली.

कल्याणीनगर येथे दुचाकीवरून जात असलेल्या अनीष आणि अश्विनी या दोघांना उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी आरोपी मुलाला चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले. यानंतर आरोपी मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप करण्यात आला. एका आमदारावरही आरोपी मुलाला वाचवण्याचा आरोप झाला. दरम्यान, त्याच्या रक्ताचे नमुने देखील बदलण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले. त्याला या प्रकरणी रस्ते सुरक्षा विषयावर निबंध लिहिणे आणि वाहतुकीचे वेगवेगळे नियम पाळत वाहतूक पोलिसांसोबत १५ दिवस घालवण्याची शपथ घेणे अशा सौम्य अटींवर अपघातानंतर काही तासांतच किशोर न्याय मंडळाने त्याला जामीन मंजूर केला. या अटींमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

बाल न्याय मंडळाने सुरुवातीला नागरिकांच्या विरोधानंतर आरोपी अल्पवयीन मुलाला २२ मे रोजी निरीक्षण गृहात पाठवले. मात्र, २५ जून रोजी उच्च न्यायालयाने किशोर न्याय कायद्याचे पालन करण्यावर भर देत ही अटक बेकायदेशीर ठरवली व मुलाला जामीन मंजूर केला.

सूत्रांनी नमूद केले आहे की मुलाने लिहिलेल्या निबंधात सामान्य रस्ता सुरक्षा नियमांवर भर दिला आहे. त्यात अपघात किंवा दोन व्यक्तिंचा जीव गेल्याबद्दल फारसे काही लिहिण्यात आलेले नाही. बाल न्यायालय मंडळाच्या सूत्रांनी सांगितले की, "हा निबंध अतिशय सामान्य आहे, ज्यामुळे अल्पवयीन मुलाच्या भावनिक स्थितीचा अंदाज घेणे कठीण आहे.

अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडील आणि आजोबा अजूनही तुरुंगात आहेत. बुधवारी त्यांचे वकील प्रशांत पाटील किंवा बाल न्यायालय मंडळाचे सदस्य लक्ष्मण धनावडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी या तरुणाच्या ट्रॅफिक मॉनिटरिंग ड्युटीबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची पोलिसांची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर