मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune drowns : पुण्यात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुली बुडाल्या, एकीचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश!

Pune drowns : पुण्यात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुली बुडाल्या, एकीचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश!

Jun 09, 2024 11:04 AM IST

Teen Girl Drowns In Pune: कात्रज-कोंढवा रस्त्यावर ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी महाकाली मंदिराजवळ खड्डा खोदण्यात आला होता, याच खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात खड्यात बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू
पुण्यात खड्यात बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Pune Drowns: पुण्यातील कात्रज परिसरात पावसाच्या पाण्याने भरलेल्या बांधकामाच्या खड्ड्याच्या काठावर कपडे धुताना एका अल्पवयीन मुलीचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (०९ जून २०२४) सकाळी घडली. तिच्या मदतीला धावून आलेल्या तिच्या तीन मैत्रिणीही बुडू लागल्या. हे समजात घरच्यांनी त्या सर्वांना वाचवले. मात्र, एका मुलीची तब्येत बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली. कात्रज-कोंढवा रस्त्यावर ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी महाकाली मंदिराजवळ खड्डा खोदण्यात आला होता.

ट्रेंडिंग न्यूज

मुस्कान देवा शिलावट (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे. तर, सरगम जगदीश शिलावट (वय १५), जानूबाई रमेश शिलावट (वय १६) आणि तेजल जगदीश शिलावट (वय १२) अशी सुटका करण्यात आलेल्या मुलींचे नाव आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फूट खोल खड्ड्यात पडलेली पादत्राणे बाहेर काढताना मुस्कान पाण्यात पडली.

कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सांगितले की, आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मुलीला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बंजारा समाजातील मुली व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वास्तव्यास आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रशियन नदीत बुडालेल्या जळगावच्या चार विद्यार्थ्यांचे मृतदेह भारतात आणले

रशियन आपत्कालीन सेवेने त्यांच्या परिसरातील उर्वरित दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती जळगाव जिल्हा प्रशासनाने शनिवारी दिली. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, ४ जूनच्या घटनेनंतर पहिल्या दोन दिवसात दोन मृतदेह सापडले होते, तर रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की आज सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले.मृतदेह मुंबईला नेण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहेत.हर्षल अनंतराव देसले, जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी, मलिक गुलाम मोहम्मद याकूब यांचा बुडून मृत्यू झाला, तर निशा भूपेश सोनवणे ही विद्यार्थिनी बचावली. हे सर्व जण यारोस्लाव-द-वाइज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते आणि त्यांचे वय १८ ते २० वर्षे होते.

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी व्होल्खोव नदीकाठी फिरत असताना पाण्यात शिरले. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील जिशान पिंजारी व जिया पिंजारी हे सख्खे भाऊ होते. देसले हे जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील रहिवासी होते. सोनवणे हे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग