Thane: ठाण्यातील धक्कादायक घटना, इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane: ठाण्यातील धक्कादायक घटना, इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Thane: ठाण्यातील धक्कादायक घटना, इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Oct 06, 2024 12:37 AM IST

Teen boy dies after falling building In Thane: ठाण्यात एका व्यावसायिक इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे.

ठाणे: इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मुलाचा मृत्यू
ठाणे: इमारतीच्या आठव्या मजल्यावरून मुलाचा मृत्यू

Thane Teen Boy Dies After Falling Building: ठाणे जिल्ह्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी दिली. ही घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंकज रामरतन यादव असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो वागळे इस्टेट मधील कॉम्प्लेक्सच्या आठव्या मजल्यावरील खिडकीजवळ उभे असताना खाली पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. मृत मुलगा मुंबईतील कुर्ला येथील रहिवासी आहे.

वडिलांच्या रायफलने स्वत:वर गोळी झाडली, मुलाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात एका १६ वर्षीय मुलाने वडिलांच्या परवानाधारक रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. सुयश नगरकर असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील सोनार आहेत. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुयश नगरकर इयत्ता दहावीत शिकत होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तो नैराश्यात होता. शाळेतही जात नव्हता. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी त्याने आपल्या वडिलांच्या रायफलने स्वत:वर गोळी झाडली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी महाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा

भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा मानसिक तणावातून लोक आत्महत्येचा निर्णय घेतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असेल तर, सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल, याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणती चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील मोठ्या आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर