मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Radhanagari Kolhapur: शिक्षकानं विद्यार्थिनींना दाखवला पॉर्न व्हिडिओ; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Radhanagari Kolhapur: शिक्षकानं विद्यार्थिनींना दाखवला पॉर्न व्हिडिओ; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 31, 2023 12:31 PM IST

radhanagari Kolhapur porn video case : शाळेतील नराधम शिक्षकानंच विद्यार्थींना पॉर्न व्हिडिओ दाखवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं आता पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Radhanagari Kolhapur Crime News Marathi
Radhanagari Kolhapur Crime News Marathi (HT_PRINT)

Radhanagari Kolhapur Crime News Marathi : पुणे शहरात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरातील राधानगरीच्या एका शाळेत शिक्षकानं विद्यार्थीनींना पॉर्न व्हिडिओ दाखवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं आता कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेनंतर आता आरोपीची तातडीनं बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्ही.पी बांगडी असं आरोपी शिक्षकाचं नाव असून तो राधानगरीतील विद्यालंकार शाळेत इंग्रजी विषय शिकवत होता. त्यानंतर आता राधानगरीत संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातल्या विद्यालंकार शाळेत इंग्रजीचा तास सुरू असताना आरोपी शिक्षक व्ही.पी बांगडी यानं नववी आणि दहावीच्या विद्यार्थीनींना पॉर्न व्हिडिओ दाखवला. त्यानंतर मुलींना वर्गात घडलेला हा सारा प्रकार आपल्या पालकांसहित मुख्याध्यापकांना सांगितला. त्यानंतर आरोपी शिक्षकाची बदली करण्यात आली असून पालकांनी नराधम शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इंग्रजीचा तास सुरू असताना आरोपी शिक्षकानं मुलींना पॉर्न व्हिडिओ दाखवून विद्यार्थीनींवर वाईट नजर टाकल्याचाही आरोप वर्गातील विद्यार्थ्यांनी केला आहे.

आरोपी शिक्षकानं असं धक्कादायक कृत्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नसून यापूर्वीदेखील त्यानं अशाच प्रकारे विद्यार्थीनींना छेडल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता त्यानं थेट वर्गातील मुलींनाच पॉर्न व्हिडिओ दाखवल्याची घटना समोर आल्यानंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. राधानगरीतील विद्यालंकार शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आरोपी शिक्षक व्ही.पी बांगडी याची तातडीनं बदली करण्यात आली असून त्याच्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळं आता संतप्त पालकांनी आरोपी शिक्षकाला निलंबित करून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

IPL_Entry_Point