बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू

बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू

Jan 17, 2025 08:35 AM IST

Teacher Recruitment : शिक्षक भरतीचा दूसरा टप्पा लवकरच सुरू केला जाणार आहे. अभियोग्यता व बुद्धीमता बाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली असून २० जानेवारी पासून पुन्हा पवित्र पोर्टल सुरू केले जाणार आहे.

बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू
बेरोजगारांसाठी गुड न्यूज! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात; २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल होणार सुरू

Teacher Recruitment : राज्यातील बेरोजगारांसाठी महत्वाची बातमी आहे. बीएड धारक तसेच शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आता सरकारी नोकरीत भरती होण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे. शिक्षक भरतीचा पहिला टप्पा आटोपल्यावर आता दुसऱ्या टप्प्याला या महिन्यापासून सुरुवात केली जाणार आहे. २० जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु केले जाणार असून शिक्षक भरतीचा दूसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या तरुणांना आता शिक्षक होण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची अनेक पदे रिक्त होती. त्यामुळे ही पदे कधी भरली जाणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यानुसार शासनाने गेल्या वर्षी शिक्षक भरती केली. मात्र, यातील काही पदे ही रिक्त आहेत. या सोबतच शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी देखील शिक्षकांची संख्या पुरेशी हवी आहे. त्यात भविष्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार सेमी इंग्रजीचे वर्ग देखील सुरू केले जाणार आहे. त्यामुळे चांगल्या शिक्षकांची गरज आहे. शिक्षण विभागाने शासनाकडे तब्बल १३ ते १५ हजार शिक्षकांची भरती करण्याची मागणी केली असून शिक्षण विभागाने संबंधित संस्थांकडून पुन्हा जाहिरात मागिवली आहे.

पहिली भरती प्रक्रिया पूर्ण

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमता बाचणी २०२२ नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण केली गेली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील पदभरती केली जाणार आहे. शासन निर्णय 10 नोव्हेंबर २०२२ नुसार या बाबत कार्यवाही केली जाणार असून १४ जानेवारी २०२५ला पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठी ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता प्राप्त मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा २० जानेवारी पासून केली जाणार आहे. त्यानुसार संस्थांनी पवित्र पोर्टलवर आपल्या संस्थेतील शिक्षक पदभरतीची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या शिक्षक भरतीतील जिल्हा परिषदेत शिक्षकांची १० टक्के पदे रिक्त आहेत, पहिल्या फेरीतील अपात्र, गैरहजर तसेक रुजू न झालेले उमेदवार असल्याने या रिक्त पदासाठी ही भरती केली जाणार आहे. जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करुन देण्याबाबत देखील सांगण्यात आलं आहे. या बाबतचे पत्र राज्य शिक्षण आयुक्तालयाकडून विभागीय शिक्षणाधिकारी, जिल्हा व तालुकास्तरावरील शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर