Swargate Pune Crime : पुण्यात स्वारगेट येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॉम्प्युटर क्लासच्या वर्गात ११ मुलाने शर्ट इन केला नाही या कारणामुळे शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या नाका तोंडातून रक्त आले आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश भोसले (वय २६) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी मारहाण झालेल्या मुलाच्या वडिलांनी (वय ४४) स्वारगेट पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ सप्टेंबर रोजी येथील एका शाळेत ६ वीच्या वर्गात घडली.
फिर्यादीचा मुलगा हा स्वारगेट येथील एका शाळेत शिकतो. त्याचे वय ११ वर्ष असून तो सध्या ६ वीत आहे. २७ सप्टेंबर रोजी त्याचा कॉम्प्युटरचा क्लास सुरू होता. यावेळी मुलाने शर्ट इन केला नव्हता. ही बाब कॉम्प्युटरचे शिक्षक संदेश भोसले यांनी पहिली. त्यांनी मुलाला जवळ बोलवत त्याला इनशर्ट का केले नाही यावरून जाब विचारत त्याला मरण करण्यास सुरुवात केली. या गंभीर मारहाणीत मुलगा हा गंभीर जखमी झाला. त्याच्या नाकातून व कानातून रक्त येऊ लागले. त्याने घरी आल्यावर त्याच्या आई वडिलांना हा प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी या प्रकरणी थेट स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानावडे तपास करीत आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटन मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या पूर्वी वानवडी येथील एका शाळेच्या स्कूलबसमधे दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. तर खराडी येथे देखील एका ३ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. या दोन्ही घटना ताज्या असतांना पुण्यातील कोंढवा येथे आणखी एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका पाच वर्षांच्या मुलांवर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.