धावत्या टॅक्सीत चालकाचे तरुणीसमोर हस्तमैथुन, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धावत्या टॅक्सीत चालकाचे तरुणीसमोर हस्तमैथुन, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धावत्या टॅक्सीत चालकाचे तरुणीसमोर हस्तमैथुन, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Dec 13, 2024 11:01 AM IST

Mumbai Crime News : मुंबईत काही दिवसांपूर्वी टॅक्सीमधील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत टॅक्सीचालक हा एका तरुणीसमोर हस्त मैथुन करत असल्याचं दिसत होतं. या चालकावर कारवाईची मागणी होत होती. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबईत धावत्या टॅक्सीत तरुणीसमोर चालकाचे हस्तमैथुन करत अश्लील कृत्य; पोलिसांनी केली अटक
मुंबईत धावत्या टॅक्सीत तरुणीसमोर चालकाचे हस्तमैथुन करत अश्लील कृत्य; पोलिसांनी केली अटक (file photo)

Mumbai crime : मुंबईत एका टॅक्सीचालकाने टॅक्सीत बसलेल्या महाविद्यालयीन तरुणीसमोर हस्तमैथुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या नंतर या टॅक्सी चालकावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती. पोलिसानी या टॅक्सी चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी एक तरुणी ही टॅक्सीमध्ये बसली होती. यावेळी आरोपी टॅक्सीचालकाने तरुणीसमोर टॅक्सीमध्ये हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली होती. या घटनेमुळे तरुणीला मोठा धक्का बसला होता. तिच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम झाला. यामुळे तिला उपचार घेण्याची वेळ आली होती. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. तर काहींनी या घटनेबाबत पोस्ट देखील लिहिली होती. एकाने या प्रकरणी इंस्टाग्रामवरील पोस्ट लिहीत सोफिया कॉलेज ते ग्रँट रोड स्थानकापर्यंत शेअर केलेल्या टॅक्सीने प्रवास करताना एका महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनीला भयानक अनुभव आला. टॅक्सीत बसलेल्या एका व्यक्तीने तिच्यासमोर हस्तमैथुन केले. या घटनेमुळे विद्यार्थिनीला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी कारवाई व्हायला हवी.

यानंतर या प्रकरणी अनेकांनी कारवाईची मागणी केली होती. अनेक नेटकऱ्यांनी या प्रकरणी संताप देखील व्यक्त केला होता. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली. गावदेवी पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपीचा टॅक्सीचालकाचा माग काढला. यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने असे आणखी काही कृत्य केलं आहे का ? याचा पोलिस शोध घेत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत महिला खरचं सुरक्षित आहेत का असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अशा घटनांना आवर घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी पडीत तरुणीच्या मैत्रिणीने तक्रार करत तिला न्याय मिळून देण्यासाठी नागरिकांना आव्हान केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर