मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Marathon : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडणार असाल तर आधी हे वाचा! मॅरेथॉनमुळे अनेक रस्ते बंद राहणार

Mumbai Marathon : मुंबईकरांनो, उद्या घराबाहेर पडणार असाल तर आधी हे वाचा! मॅरेथॉनमुळे अनेक रस्ते बंद राहणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 20, 2024 12:12 PM IST

Tata Marathon traffic change in Mumbai: मुंबईत उद्या टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. धावपटूंना मार्ग देण्यासाठी उद्या मुंबईत वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.

TataMarathon
TataMarathon

TataMarathon traffic change in Mumbai: मुंबईत उद्या टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. धावपटूंना मार्ग देण्यासाठी उद्या मुंबईत वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. दक्षिण आणि मध्य मुंबीत एमआरए आझाद मैदान, काळबादेवी, डी.बी मार्ग, मलबार हिल, वरळी, वांद्रे दादर आणि माहीम वाहतूक विभागामध्ये खालीलप्रमाणे वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी यांची दाखल घेऊन घराबाहेर पडावे, तसेच मॅरेथॉनसाठी येणाऱ्या नागरिकांनी याची दखल घेऊन नेमून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्क करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात हुडहुडी वाढणार! मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात तापमानात होणार मोठी घट

मुंबईत उद्या, बृहन्मुंबई टाटा मॅरेथॉनवे आयोजन करण्यात आलेले आहे. यात फुल मॅरेथॉन हौशी (अॅम्युचर), अर्थ मॅरेथॉन, १० किलोमीटर रन, फुल मॅरेथॉन इलाईट, चॅम्पीयनस विथ डिसोंबीलीटी रन, सिनीयर सिटीझनस रन, ड्रिम रन अशा सात स्पर्धा होणार आहेत. या मॅरेथॉनचा मार्ग हा दक्षिण तसेच मध्य वाहतूक विभाग हद्दीतील आझाद मैदान, कुलाबा, मरीन ड्राईव्ह, काळबादेवी, डी.बी. मार्ग, ताडदेव, वरळी, बांद्रा, दादर, व माहिम वाहतुक विभागातून मॅरेथॉनचा मार्ग आहे. सदर दिवशी मॅरेथॉन स्पर्धकांसाठी मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्यात आला असून या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वरळवण्यात आली आहे.

worli girl rape: इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात! वरळीत दारूच्या नशेत तरुणीवर बलात्कार

फुल मॅरेथॉन हौशी (अॅम्युचर) ही स्पर्धा सकाळी ०५.०० ते १२.३० दरम्यान पार पडणार आहे. याची सुरवात ही सी.एस.एम.टी. मार्गाने होणार आहे. ही रन पुढे डॉ. डी. एन. रोड- उजवे वळण विर नरीमन रोड- डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग - आंबेडकर पुतळा उजवे वळणे मादाम कामा रोड महर्षी कर्वे रोड डावे वळण विर नरीमन रोड - डावे वळण एन.एस. रोड - डावे वळण विनय के शाह मार्ग - यु टर्न- एन.एस. रोड- एअर इंडीया बिल्डीग जंक्शन परत मरिन ड्राईव्हने चौपाटी -उजवे वळण बाबुलनाथ मार्ग डावे वळण एन. एस. पाटकर मार्ग - केमस कॉर्नर ब्रिज-हाजीअली जं-लाला लजपतराय मार्ग- डॉ. अॅनी बेझंट मार्ग-मेला रेस्टारंट डावे वळण - खान अब्दुल गफारखान रोड- बांदा वरळी सी लिंक-टोल प्लाझा-बांद्रा- माहिम कॉजवे उजवे वळण जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग माहिम चर्च जं उजवे वळण-कॅडल रोड-स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सिध्दिविनायक मंदिर जं- डॉ. अॅनी बेझंट मार्ग ग्लॅक्सो पोदार हॉस्पीटल जंक्शन उजवे वळण थडाणी मार्ग उजवे वळण-खान अब्दुल गफारखान मार्ग-आय.एन.एस त्राता नारायण हर्डीकर मार्ग यु टर्न, आय.एन.एस. त्राता-खान अब्दुल गफार खान मार्ग -वरळी सी. फेस- वरळी डेअरी-मेला जंक्शन-डॉ. अॅनी बेझंट रोड-लाला लजपतराय मार्ग-हाजीअली जं-केम्स कॉर्नर ब्रिज-आर.टी.आय जंक्शन उजवे वळण- बाबुलनाथ मार्ग डावे वळण-बॅन्डस्टँड-डॉ. एन. एस. पुरंदरे मार्ग विर नरीमन रोड सी.टी.ओ. जंक्शन-डावे वळण-ओ.सी.एस. चौकी येथे समाप्त होईल.

अर्थ मॅरेथॉन ही काळी ०५.०० ते ०९.१० दरम्यान, पार पडणार असून याची सुरुवात ही माहिम रेती बंदर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ५ कार्यालय समोरील मैदान- जनरल अरूण कुमार वैद्य मार्ग - कोंबडी गल्ली- बांदा रिक्लेमेशन- वरळी सी.लीक टोल नाका वरळी सी लिंक गेट डावे वळण- जे.के. कपूर चौक (आय.एन.एस. त्राता) उजवे वळण- खान अब्दुल गफारखान रोड- बिंदु माधव जंक्शन डावे वळण - डॉ. आर.जी. थडानी मार्ग - पोद्दार जंक्शन डावे वळण- डॉ. डॉ. अॅनी बेझंट रोडने ग्लॅस्को जंक्शन यु टर्न- डॉ. अॅनी बेझंट रोडने - पोद्दार जंक्शन उजवे वळण - डॉ. आर. जी. थडानी मार्गने - बिंदु माधव जंक्शन डावे वळण- वरळी दुध डेअरी- खान अब्दुल गफारखान जंक्शन (मेला जंक्शन) डावे वळण अॅनी बेझंट रोडने आचार्य आत्रे चौक (वरळी नाका) यु टर्न - डॉ. अॅनी बेझंट रोडने खान अब्दुल गफारखान जंक्शन (मेला जंक्शन) लोटस जंक्शन- नेशनल स्पोटर्स क्लब ऑफ इंडीया पर्यत - लाला लजपतराय मार्ग-हाजीअली जक्शनं भुलाबाई देसाई रोड ने महालक्ष्मी जंक्शन पर्यत - गोपालराव देशमुख मार्ग (पेडर रोड) केम्स कॉर्नर ब्रिज- बाबुलनाथ टेम्पल रोड - बॅन्डस्टँड-डॉ एन पुरंदरे मार्ग- गिरगाव चौपाटी - एन.एस. पुरंदरे मार्ग सुंदर महल जंक्शन - विर नरीमन रोड पर्यंत पारसी विहीर डावे वळण - कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाने ओसीएस, जंक्शन येथे समाप्त होईल,

१० किलोमीटर रन वेळ सकाळी ०६.०० ते ०७.५८ वाजता सुरू होणार आहे. तर सी.एस.एम.टी - डी. एन. रोड- फ्लोरा फाऊंन्टन (हुतात्मा चौक) येथुन विर नरीमन रोड डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग उजवे वळण मादाम कामा रोड - उजवे वळण महर्षी कर्वे रोड - डावे वळण विर - - नरीमन रोड - डावे वळण एन. एस. रोड - डावे वळण - मादाम कामा रोड-हुतात्मा राजगुरु चौक- यु टर्न-एअर इंडिया बिल्डिंग-एन.एस. रोड-डावे वळण-विनय के शहा मार्ग-जमनालाल बजाज मार्ग -यु टर्न-उजवे वळण-एन.एस.रोड- प्रिंसेस स्ट्रीट ब्रिजखाली यु टर्न-एन.एस. रोड-किलाचंद चौक-डावे वळण विर नरीमन रोड डावे वळण - कर्मवीर - भाऊराव पाटील मार्गाने ओसीएस जंक्शन येथे समाप्त होईल.

फुल मॅरेथॉन इलाईट ही स्पर्धा सकाळी ०७.२० ते १०.५० वेळेत पार पडणार आहे. याची सुरवात सी.एस.एम.टी. - डॉ. डी. एन. रोड- उजवे वळण विर नरीमन रोड- डावे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग - उजवे वळणे मादाम कामा रोड- उजवे वळण महर्षी कर्वे रोड चर्चगेट जंक्शन- उजवे वळण-वीर नरिमन - रोड-उजवे वळण-कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग-उजवे वळण- मादाम कामा रोड-उजवे वळण- महर्षि कर्वे रोड-डावे वळण - विर नरीमन रोड - डावे वळण एन. एस. रोड यु टर्न एअर इंडीया बिल्डीग जंक्शन परत मरिन ड्राईव्हने चौपाटी -उजवे वळण - बाबुलनाथ मार्ग डावे वळण एन. एस. पाटकर मार्ग केमस कॉर्नर ब्रिज - हाजीअली जं-लाला लजपतराय मार्ग- डॉ. अॅनी बेझंट मार्ग-मेला रेस्टारंट डावे वळण - खान अब्दुल गफारखान रोड- बांद्रा वरळी सी लिंक-टोल प्लाझा-बांदा- माहिम कॉजवे जं- उजवे वळण जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग- माहिम चर्च जं उजवे वळण-कॅडल रोड-स्वातंत्रवीर सावरकर मार्ग - सिध्दिविनायक मंदिर जं-डॉ. अॅनी बेझंट मार्ग-ग्लॅक्सो पोदार हॉस्पीटल जंक्शन उजवे वळण थडाणी मार्ग उजवे वळण-खान अब्दुल गफारखान मार्ग-आय.एन.एस त्राता - नारायण हर्डीकर मार्ग -यु टर्न- आय.एन.एस. त्राता-खान अब्दुल गफार खान मार्ग -वरळी सी. फेस- वरळी डेअरी-मेला जंक्शन-डॉ. अॅनी बेझंट रोड-लाला लजपतराय मार्ग-हाजीअली जं-केम्स कॉर्नर ब्रिज-आर.टी.आय जंक्शन उजवे वळण- बाबुलनाथ मार्ग डावे वळण- कवीवर्य भा. रा. तांबे चौक (बॅन्डस्टैंड) - डॉ एस. एन. पुरंदरे मार्ग विर नरीमन रोड पर्यंत- हुतात्मा चौक येथे डावे वळण - डि.एन. रोड डावे वळण-सी.एस.एम. टी. जंक्शन येथे समाप्त होईल.

५. चॅम्पीयनस विथ डिसोंबीलीटी रन ही सकाळी ०७.२२ ते ०८.०५ वेळेत होणार असून याची सुरवात-सी.एस.एम.टी. - डॉ.डी.एन. रोड- फ्लोरा फाऊंन्टन (हुतात्मा चौक) - विर नरीमन रोड - उजवे वळण कर्मवीर भाऊराव पाटील मार्गाने ओसीएस, जंक्शन येथे समाप्त होईल.

सिनीयर सिटीझन्स रन ही सकाळी ०७.३५ ते ०९.०५ वाजता सुरू होणार आहे. याची सुरुवात ही सी.एस.एम.टी. - डॉ. डी. एन. रोड- उजवे वळण- विर नरीमन रोड- किलाचंद चौक- एन.एस. रोड ने - प्रिन्सेस फ्लाय ओवर ब्रिज येथे यु टर्न प्रिसेंस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ब्रिज वरती - पारसी जिमखाना - पारसी डेरी शामलदास गांधी रोड - उजवे वळण जगन्नाथ शंकर शेठ मार्ग (गिरगाव रोड) मेट्रो जंक्शन - येथे समाप्त होईल.

ड्रिम रन ही स्पर्धा सकाळी ०८.०० ते १०.४० वेळेत होणार आहे. याची सुरुवात ही सीएसएमटी येथुन होऊन ही रन डी. एन. रोड-हुतात्मा चौक उजवे वळण-वीर नरीमन रोड-डावे वळण - एन.एस. रोड ने - प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओवर ब्रिज येथे यु टर्न पारसी डेरी शामलदास गांधी रोड- उजवे वळण जगन्नाथ शंकर शेठ मार्ग (गिरगाव रोड) मेट्रो जंक्शन- येथे समाप्त होईल.स्पर्धेकरीता येणाऱ्या धावपटुंनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा विशेषतः रेल्वे / लोकल ट्रेनचा ) वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे मार्ग राहणार बंद

मॅरेथॉन रनच्या वेळी डी.एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (CSMT) ते नगर चौक (भाटिया जंक्शन) रस्ता २० जानेवारी रात्री ११ ते २१ जानेवारी दुपारी १.१५ पर्यंत बंद राहील तसेच पुढील राते २१ जानेवारी रोजी पहाटे ३ ते दुपारी १.१५ पर्यंत बंद राहतील.

एम.जी. रोड : बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते ओसीएस चौक, बॉम्बे हॉस्पीटल येथुन येणाऱ्या वाहतुकीस बंद राहील

के. बी. पाटील मार्ग : मादाम कामा रोड, येथुन सी.टी.ओ. चौककडे येणाऱ्या वाहतुकीस बंद ओ.सी.एस. चौक ते सी.एस. एम. टी, चौक येथून येणाऱ्या वाहतुकीस बंद

हजारी महल सोमाणी मार्ग : ओ.सी. एस चौक ते सी. एस. एम.टी चौक येथून येणाऱ्या मार्गात बदल.

विर नरीमन रोड : एनएसरोड व हुतात्मा चौक येथून येणारा मार्ग बंद.

आनंदीलाल पोदार मार्ग : आनंदीलाल पोदार चौक ते बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) येथून येणाऱ्या वाहतुकीरा बंद

मादाम कामा रोड : आंबेडकर पुतळा व वेणुताई चव्हाण चौक। (एअर इंडीया जंक्शन)

पुरषोत्तम ठाकुरदास रोड : हजारी मल रोडकडून डी. एन. रोडकडे जाणाऱ्या वाहतुकीस बंद

चरणजीत दास मार्ग : हजारी मल रोडकडून डी. एन. रोडकडे जाणाऱ्या वाहतुकीस बंद

एमके रोड : अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) ते गोदरेज चौक

जे टाटा रोड : एन.सी.पी.ए. पर्यंत वाहतूकीस बंद

एन एस रोड : एन. सी.पी.ए. ते कवीवर्य भा. रा. तांबे चौक. (बॅण्ड स्टैंड) दोन्ही वाहीनी. आय.एम.सी. बिल्डींग ते किलाचंद चौक (सुंदरमहल चौक). ई रोड ते आबासाहेब गरवारे चौक पर्यतच्या वाहतूकीस बंद. अनुव्रत मार्ग ते एन. एस. रोड पर्यंत वाहतूकीस बंद. पाटण जैन मंडल मार्ग ते एन. एस. रोड पर्यंत वाहतूकीस बंद. डी. रोड चौक ते एन. एस. रोड पर्यत वाहतुकीस बंद. बी. रोड चौक ते एन. एस. रोड पर्यत वाहतुकीस बंद. बॉबी तल्यार खान गेट ते एन. एस. रोड पर्यत वाहतुकीस बंद. दिनशा वाच्छा रोड ते एन.एस. १. रोड पर्यत वाहतुकीस बंद, बाबुभाई चिनॉय पथ ते एन. एस. रोड पर्यत वाहतूकीस बंद, विनय के शहा मार्ग ते एन. एस. रोड पर्यत वाहतूकीस बंद.

दिनशा वाच्छा रोड़ : जे. टाटा रोड ते के.सी. कॉलेज पर्यत वाहतूकीस बंद.

एच.टी. पारेख मार्ग : आकाशवाणी कडून महर्षी कर्वे रोड कडे जाणाऱ्या वाहतूकीस बंद.

एस.व्ही.पी. रोड : बी.आर देवधर चौक (सुखसागर चौक) ते व्ही.व्ही. पंत चौक (विनोली चौपाटी) पर्यंत वाहतूकीस बंद.

वाळकेश्वर रोड : आर.डी. सावंत चौक (तिनबत्ती) कडून कविवर्य भा.रा. तांबे चौक.

बाबुलनाथ मार्ग : दादी शेठ लेन उत्तर वाहीनी वरून येणान्या वाहतूकीस बंद.

जे.जे. उड्डाण पूल (कुतुबे कोकम मकदम अली माहिमी उड्डाण पुल) : दक्षिण आणि उत्तर वाहिनी दोन्ही बंद

पंडीता रमाबाई मार्ग दक्षिण वाहीणी : भारतीय विद्याभवन कडून एन. एस. रोडकडे जाणाऱ्या वाहतूकीस बंद.

एन.एस. पाटकर रोड (हुजेस रोड) : सीसील जंक्शनकडून आर. टी. आय जंक्शनकडे जाणारी वाहतूकीस बंद.

गोपाळराव देशमुख मार्ग : ऑगस्ट क्रांतीमार्ग (केमस कॉर्नर येथे डावे व उजवे वळण नाही), डहाणूकर दक्षिण वाहिनी (कारमायकल चौक) येथील वाहतूकीस बंद, माऊंट यूनीक लेन पर्यत वाहतुकीस बंद. गमाडीया चौक कडील वाहतूकीस बंद.

भुलाभाई देसाई मार्ग : तल्यार खान चौक पुढे कॅटबरी चौक पर्यत वाहतूकीस बंद.

मदन मोहन मालचिाया मार्ग (ताडदेव रोड) : वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली) कडून ( उजवे वळण मुक्त),

डॉ. ए. बी. रोड उत्तर व दक्षिण वाहिनी : लोटस जंक्शन ते वरळी नाका आणि वरळी नाका ते सेंदूरी बाजार चौक पर्यंत वाहतूकीस बंद.

एन. एस. रोड व हुतात्मा चौक येथुन डी. एन. रोडकडून हजारीगल सोमानी मार्गाकडे जाणाऱ्या वाहतुकीस बंद. ( बॅन्ड स्टॅन्ड चौक) पर्यत वाहतूकीस बंद. महालक्ष्मी मंदीर लेन (महालक्ष्मी मंदीर ते कॅडबरी चौक) पर्यत वाहतूकीस बंद.

खान अब्दूल गफारखान : (दक्षिण व उत्तर वाहीनी) वाहतूकीस बंद राहील.

पोदर चौक येथुन आर.जी. थडाणी मार्ग : पुर्णपणे (दक्षिण व उत्तर वाहीनी) बंद राहील.

सांघीपथ येथूनडॉ अॅनी बेझंट रोड : लोटस जंक्शन येथे येण्यास बंद राहील.

इडन हॉल/समुद्र महल येथून डॉ.अॅनी बेझंट मार्ग : उत्तर वाहीनी लोटस जंक्शन येथे येण्यास बंद राहील.

बी. जे. खेर मार्ग गॅप येथून, खान अब्दुलगफारखान मार्ग दक्षिण वाहिनी येथे येण्यास बंद

खान अब्दुलगफारखान मार्ग : सुभेदार नगर झोपडपट्टी गॅप येथून दक्षिण वाहीनी येथे येण्यास बंद. वरळी डेअरी, दक्षिण वाहीनी येथे येण्यास बंद. सागर तरंग, दक्षिण वाहीनी बंद.

सर पोचखानवाला रोड : आयएनएस त्राता येथे येण्यास बंद

खान अब्दुलगफारखान मार्गावर कोस्टगार्ड येथून येण्यास बंद.

डॉ अॅनी बेझंट रोड : आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) येथून गफारखान जंक्शन येथे येणेस बंद

गोल्फादेवी लेन : हर्डिकर मार्गावर येण्यास बंद.

वरळी कोळीवाडा लेन : हर्डिकर मार्गीवस्येण्यास बंद.

सासमिरा चौक लेन : सेक्रेड हार्ट हायस्कूल येथून हर्डिकर मार्गावर येण्यास बंद.

टेमकर मार्गावरुन : हर्डिकर मार्गावर येण्यास बंद.

सर पोचखानवाला रोड : शहिद ओंबळे चौक येथून थडाणी मार्ग येथे येण्यास बंद.

जयवंत पालकर मार्ग :थडाणी मार्गावर येण्यास बंद. विनस अपार्टमेंट येथून येण्यास बंद

थडाणी मार्गावर : विनय अपार्टमेट येथून बंदी

पांडूरंग बुधकर मार्ग : ग्लाक्स्को चौकात येण्यास बंदी.

सारिमरा मार्ग : बॅन्ड बॉक्स चौकाकडे येण्यास बंदी.

डॉ. अॅनी बेझंट मार्ग : उत्तर वाहीनी, काकड चेंबर विरूध्द बाजूकडिल गॅपमधून ईलेक्ट्रिक पोल नं. एबीटी ३७ जवळ येण्यास बंद.

खान अब्दुल गफारखान मार्ग : व्हीनस गॅप सिग्नल येथून येण्यास बंद.

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : एस बँक ते सिध्दीविनायक जंक्शन पर्यंत दोन्ही वाहिनी आणि सिध्दीविनायक जंक्शन ते सेन्च्युरी जंक्शन उत्तर वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

डॉ. अॅनी बेझंट रोड : बाबासाहेब वरळीकर चौक (सेंच्युरी जंक्शन) ते स्व. नारायण हर्डीकर चौक पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

जन, अरुणकुमार वैदय मार्ग नॉर्थ : माहिम चौक ते माहिम कॉजवे पर्यत बंद.

कॅडल रोड दोन्ही वाहिनी : माहिम चौक ते यस बैंक पर्यत बंद

मोरी रोड नॉर्थ बॉन्ड : माहिम फाटक ते माहिम चौक पर्यत बंद

के.सी. मार्ग : दक्षिण वाहिनी वरील वाहतुक लिलावती चौकच्या समोर सी लिंक.

एस. व्ही. रोड दक्षिण वाहिनी : बांदा फ्लाय ओव्हर ब्रिजमार्गे सी लिंक रोडकडे जाणारी वाहतुक बांद्रा वाहतुक चौकीचे बाजुचे डाव्या वळणावर बंद राहील.

पश्चिम द्रुतगती दक्षिणवाहीनीने महामार्ग बाद्रा वरळी सी लिंककडे जाणारी वाहतुक यु ब्रिज पासून पुढे सिलिंक कडे जाण्याकरीता बंद राहील.

पश्चिम दृतगती महामार्ग दक्षिण वाहिनी : प्रबोधनकार ठाकरे उड्डाणपुलावरून बांद्रा रेल्वे ब्रिजकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद.

कलानगर जंक्शन : नंदादीप गार्डन कडून बांद्रा रेल्वे ब्रिजकडे जाणारा मार्ग बंद.

फॅमिली कोर्ट उड्डाणपुलावरून : वरळी सि-लिक कडे जाणारा मार्ग बंद

२१ जानेवारी रोजी ०३:०० वा. ते १३:१५ वा. या वेळेत खालील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सर्व प्रकारच्या मोटार वाहनांच्या पार्किंगला बंदी असेल.

 

नो पार्कीग (वाहने थांबण्यास प्रतिबंध) मार्गाची नांवे

- जे.एस.एस. रोड - श्यामलदास गांधी मार्ग ते बळवंत फडके चौक (मेट्रो चौक.), एम.जी. रोड - बळवंत फडके चौक ( मेट्रो चौक.) ते हुतात्मा चौक, श्यामलदास गांधी मार्ग एम. के. रोड जं. ते अल्फ्रेड चौक, वीर नरिमन रोड, मादाम कामा रोड, जमशेदजी टाटा रोड, महापालीका मार्ग, हजारीमल सोमानी मार्ग, महर्षि कर्वे रोड, के.बी. पाटील मार्ग, एन.एस. मार्ग, एन. ए. पुरंदरे मार्ग, बाबुलनाथ मार्ग, गोपालराव देशमुख मार्ग (पेडर रोड), भुलाभाई देसाई मार्ग कॅडबरी चौकं. ते वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली), लाला लजपतराय मार्ग वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली) ते लोटस चौक, लोटस चौक ते हार्डीकर चौक. (जुने पासपोर्ट ऑफीस) डॉ. अॅनी बेझंट रोड, अब्दुल गफार खान चौक (मेला चौक). ते हार्डीकर चौक खान अब्दुल गफारखान रोड, पोद्दार चौक. ते बिंदु माधव चौक, आर. जी. थडानी मार्गावर, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग एस बॅक ते सिध्दीविनायक चौक, डॉ. अॅनी बेझंट रोड हा बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी) ते स्व. नारायण हर्डीकर चौक, जन. अरुणकुमार वैदय मार्ग, माहिम कॉजवे दोन्ही वाहिनी, एस.व्ही.एस. रोड ते कॅडल रोड (माहिम जंक्शन एस. बँक पर्यत दोन्ही वाहिनी, एल. जे. रोड (राजा बढे चौक ते माहिम चौक पर्यत दोन्ही वाहिनी), शितलादेवी जंक्शन (शितलादेवी रोड ते सेनापती बापट रोड पर्यत दोन्ही वाहिनी), सेनापती बापट रोड (सेनापती बापट रोड, माहिम फाटक, एस. एल. रहेजा रोड, सायन- माहिम लिंक रोड दोन्ही वाहिनी), माहिम फाटक, मोरी रोड ते माहिम चौक दोन्ही वाहिनी, राजीव गांधी सागरी सेतू ( वरळी सी लिंक) उत्तर तसेच दक्षिण वाहिनी, एस. व्ही. रोड माहीम कॉजवे कैची ते माहीम कॉजवे चौक या दरम्यानची उत्तर / दक्षिण वाहिनी, के.सी. मार्ग लिलावती चौक ते एम.एस.आर.डी.सी. दरम्यानची उत्तर व दक्षिण वाहिनी.

उपरोक्त मार्ग वगळता, खालील नमूद लगत असलेले मार्ग हे वाहतूकीस अडथळा न करता ऐकेरी पार्कींग करिता वापराता येतील.

याचप्रमाणे दक्षिण मुंबईत २१ जानेवारी रोजी पहाटे ०२.०० ते रात्री २४.०० पर्यंत सर्व जड वाहनांना वाहतुकीस बंदी असेल.

बॅ. रजनी पटेल मार्ग, एस.व्ही.पी. रोड, सी.आर.२ / आयनॉक्स मॉल, विधानभवन बाहेर, बेलार्ड पिअर, बृहन्मुंबई महानगरपालीका पे अॅन्ड पार्क अल्टामाऊंट रोड, आकृती इमारत, बी.डी. रोड केशव राव खाडे मार्ग

WhatsApp channel

विभाग