Tanaji sawant son Rushiraj investigation : राज्याचे माजी मंत्री व शिवसेना पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंतचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. तपासात ऋषिराज सावंत यान हे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले असून ते त्यांच्या मित्रांसोबत बँकॉकला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे विमान चेन्नई येथे थांबवून ऋषिराज यांना पुण्यात आणण्यात आले असून या प्रकरणी पुणे पोलिस त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलं आहे.
तानाजी सावंत हे सोमवारी स्वत: पोलिस मुख्यालयात उपस्थित राहून त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले होते. पोलिसांनी देखील या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. दरम्यान, ऋषीराज सावंत हे एका विशेष विमानाने बँकाँकला निघाले असल्याची माहिती मिळाली. याची माहिती मिळताच पोलिस व तानाजी सावंत यांनी आपली शक्ति पणाला लावून हे विमान चेन्नई येथे थांबवून घेतले. यानंतर ऋषीराज सावंत यांना चेन्नईतून पुण्यात आणण्यात आले आहे. पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा व आमदार तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने ऋषीराज सावंत यांची चौकशी केली जाणार असून नेमकं काय घडलं याची देखील माहिती घेऊन योग्य कारवाई केली जाईल, तसेच त्यांचा पुणे ते चेन्नई प्रवासाची देखील माहिती घेतली जाईल असे शर्मा यांनी म्हटलं आहे.
आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ उडाली होती. मुलाचा शोध लागत नसल्याने तानाजी सावंत यांनी थेट पुणे पोलिस मुख्यालय गाठत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला. ऋषिराज हे कॅबने एअरपोर्टला गेल्याची माहिती मिळाली. ड्रायव्हरने त्यांना एयरपोर्टला सोडल्यामुळे नंतर ते कुठे गेले याची माहिती मिळत नव्हती. यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणी अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ऋषिराज हे बँकॉकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या बाबत पोलीस सहआयुक्त शर्मा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शर्मा म्हणाले सोमवारी सायंकाळी ४ वाजता पुणे पोलिसांना ऋषिराज सावंत यांना काही अज्ञात व्यक्ति घेऊन गेल्याची माहिती मिळाली. तपासात गे एका खाजगी विमानाने बँकॉकला गेल्याची देखील माहिती समोर आली. ते बँकॉकला जाणार होते याची माहिती त्यांनी घरच्यांना दिली नव्हती. विशेष विमानात त्यांच्या सोबत आणखी दोघे जण होते. ते त्यांचे मित्र होते. या प्रकरणी आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे ऋषिराज पुण्यात परत आल्यानंतर त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली जाईल. नेमकं काय घडलं याची चौकशी देखील केली जाईल, असे रंजन शर्मा यांनी स्पष्ट केले. ऋषीराज सावंत नेमके कुठं गेले होते. त्यांचे जाण्याचे कारण काय होते. त्यांच्या सोबत कोण होते. या सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत.
संबंधित बातम्या