Tanaji Sawant Son News : राज्याचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. या प्रकरणी तानाजी सावंत यांनी पोलिसांना तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलिसांनी देखील तपास सुरू करत वेगाने चक्रं फिरवली. या तपासात ऋषिराज हा त्याच्या मित्रांसोबत बँकॉकला जास्त असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, तानाजी सावंत यांनी आपला वट वापरुन बँकॉकला जाणारे विमान चेन्नई येथे थांबवलं. तसेच ऋषिराजला पुण्यात आणण्यात आलं.
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे विमान तळावर कारमधून गेला. येथून टु त्याच्या मित्रांसह चार्टर्ड विमानाने बँकॉकला जात होता. हे विमान बूक करण्यासाठी त्याने तब्बल ६८ लाख रुपये मोजल्याचे पुढे आले आहे. यावरून सध्या चर्चा सुरू आहे. ऋषिराज सावंत यांचे विमान अंदमान निकोबारपर्यंत पोहोचले होते. मात्र, तानाजी सावंत व पुणे पोलिसांनी एटीएसशी संपर्क करत हे विमान चेन्नई विमान तळावर उतरवले. हे विमान रात्री ९ वाजता पुण्यात आले.
या प्रकाराबाबत तानाजी सांवत यांनी पोलिसांसह संयुक्त पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली. सावंत म्हणाले, ऋषिराज व माझ्यात वाद झाला नाही. आम्ही रात्री गप्पा मारल्या. ऋषिराज का काही दिवसांपूर्वी दुबईला गेला होता. मात्र, ८ दिवसांत टो बँकॉकला अचानक कसा गेला हा प्रश्न पडला. त्यामुळे मला काळजी वाटत होती. मी रागवेल या भीतीने त्याने मला काही सांगितले नाही, असे त्याच्याशी बोलल्यावर कळले.
शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत हे सर्वात श्रीमंत आमदार आहे. त्यांच्याकडे २०५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तानाजी सावंत यांचे उत्पनाचे साधन उद्योग,गुंतवणूक, पगार आणि शेती आहे. डॉ तानाजीराव सावंत त्यांच्याकडे १२७ कोटी १५ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असून पत्नी शुभांगी यांच्या नावाने ३१ लाख रुपये इतकी संपत्ती आहे. सावंत यांचे पुत्र गिरीराज यांच्या नावाने ४ कोटी ३३ लाख तर ऋषीराज यांच्या नावाने ४ कोटी १० लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. डॉ सावंत यांच्या कुटुंबाकडे जवळपास शेती, घर यासारखी ६९ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अशी जवळपास डॉ सावंत यांच्याकडे २०५ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्यांना विविध बँकांचे जवळपास २३ कोटी रुपयांचे कर्ज देणे आहे. डॉ सावंत यांच्यावर २ फौजदारी गुन्हे नोंद दाखल आहे. शिक्षण महर्षी व उद्योजक असलेल्या डॉ सावंत यांच्या उत्पन्नाचा स्रोत गुंतवणुकीवरील परतावा, मालमत्ता भाडे, पगार आणि शेती उत्पन्न आहे.
संबंधित बातम्या