Tanaji Sawant Son Rishiraj Sawant : शिवसेनेचे आमदार व राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसात वेगाने यंत्रणा हलवून बँकॉकला निघालेले आमदारपुत्र ऋषीराज सावंत यांचे चार्टर प्लेन चेन्नईतूनच पुण्याकडे वळवलं. विमान व ऋषीराज सावंत यांना पोलिसांनी पुण्यात लँड होण्यास भाग पाडलं. विमान पुणे विमानतळावर उतरल्यावर आता, ऋषीराज सावंत हे बँकॉकला नेमकं कशासाठी निघाले होते, याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.
ऋषिराज सावंतने सांगितले की, तो "बिझनेस ट्रिप" साठीच चालला होता. त्याच्यासोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर असे त्याचे दोन मित्रही होते. ऋषीराज याने त्याच्या घरी बँकॉकबद्दल सांगितले आहे का, नाही याबद्दल दोन्ही मित्रांना काही कल्पना नसल्याचे समोर आले आहे. त्यातील एक मित्र हा सावंत यांच्या एका संस्थेत कार्यरत असल्याची माहिती आहे.
ऋषिराज यांचा भाऊ गिरीराज सावंत यांनी सांगितले की, सोमवारी जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज याच्याशी संपर्क होत नसल्याने तो कुठे निघून गेला हे कळत नव्हतं. त्यानंतर वडील प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यामुळे आम्ही सिंहगड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर मंत्रालयाकडून तातडीने सुत्रे हलली आणि ऋषिराज सावंत याचे चार्टर प्लेन चेन्नईतून माघारी फिरले. बंगालच्या उपसागरावर पोहचलेलं ऋषीराज सावंत यांच्या खासगी विमानाने हवेतूनच युटर्न घेतला. विमान जेव्हा लॅंड झालं तेव्हा ऋषिराज सावंत याला कळालं की, आपण बॅंकॉकला नाही तर पुन्हा पुण्यातच पोहचलो आहोत.
गिरीराज सावंत यांनी सांगितले, ८ दिवसाआधीच तो दुबईहून आला होता. दुबईला ८ दिवस राहून आल्यानंतर लगेच कामानिमित्त बँकॉकला जायचं होतं. पण घरचे बँकॉकला सोडणार नाहीत. त्यामुळे त्याने कोणालाही न सांगता केवळ एक मेसेज टाकून घरातून गायब झाला. ड्रायव्हरने सांगितले की, दोन लोकांनी त्याला जबरदस्तीने नेले आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही घाबरलो आणि आम्ही पोलिसांत तक्रार दिली आणि पुढील प्रक्रिया घडली. ऋषीराजसोबत त्याचे दोन मित्रही होते. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्याच्याबरोबर कोण आहे? त्यामुळे आम्ही अपहरणाची तक्रार दाखल केली.
संबंधित बातम्या