‘तर तुमचा देखील संतोष देशमुख केला जाईल’! तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, धाराशिवमध्ये खळबळ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘तर तुमचा देखील संतोष देशमुख केला जाईल’! तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, धाराशिवमध्ये खळबळ

‘तर तुमचा देखील संतोष देशमुख केला जाईल’! तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी, धाराशिवमध्ये खळबळ

Dec 24, 2024 09:20 AM IST

Tanaji Sawant news : राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मोठा वाद सुरू असतांना आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना तुमचा संतोष देशमुख करू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

‘तर तुमचा देखील संतोष देशमुख केला जाईल’! तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीव मारण्याची धमकी, धाराशिवमध्ये खळबळ
‘तर तुमचा देखील संतोष देशमुख केला जाईल’! तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना जीव मारण्याची धमकी, धाराशिवमध्ये खळबळ

Tanaji Sawant news : राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मोठा वाद सुरू असतांना आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना तुमचा संतोष देशमुख करू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी धारशिव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाला रस्त्यात अडवत एका बंद पाकीटामध्ये १०० रुपयांच्या नोटेसोबत ही धमकीची चिठ्ठी दिली आहे. हा ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवन्यात आला. आरोपी हे दुचाकी वरुन आले होते. त्यांनी करखण्यासाठी हे टपाल असल्याचे सांगितले. तसेच हे पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाला देण्यास सांगितले. हे पाकीट उघडण्यात आले. तेव्हा चिठ्ठीमध्ये तानाजी सावंत यांचे पुतणे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत तसेच तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना एका तुमचा संतोष देशमुख करू अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या सोबतच त्यात तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, असे लिहून धमकावण्यात आले आहे.

धारशिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हे प्रकरण उजेडात येताच तेरणा कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड व सुनिल लगडे, संजय निपाणीकर यांनी या प्रकरणी धारशिव येथील ढोकी पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे धमकीचे हे पत्र देणारे ते दोघे कोण होते ? याच देखील तपास सुरू करण्यात आला आहे.

मंत्रीपद न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहे. त्यांनी नागपूर अधिवेशनात सहभाग न घेताच माघारी परतले होते. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी आणि पक्षाचा फोटो देखील काढून टाकला होता. दरम्यान, त्यांना आता धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील मिळणार की नाही या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर