Tanaji Sawant Removed Party Symbol From Social Media: महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत हे देखील नाराज आहेत. त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया साईटच्या डीपीवरील शिवसेना नाव व पक्ष चिन्ह काढून टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी केवळ बाळासाहेब ठाकरेंचा फोटो ठेवत शिवसैनिक असं लिहिलं आहे. त्यामुळे तानाजी सांवत हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा रविवारी संध्याकाळी विस्तार करण्यात आला. या नव्या मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना व काही वाचाळ वीरांना डच्चू देण्यात आला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांना या मंत्रिमंडळात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. १५ डिसेंबरला नागपूरमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात जुन्या नव्या अशा ३९ चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं. मात्र, शिंदे गटातील दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद वगळण्यात आली आहेत. त्यामुळे हे नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे. यातील तानाजी सांवत यांनी तर त्यांची नाराजी उघड केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया साईट वरील डीपी असेलेला फोटो काढून टाकला आहे.
दरम्यान, मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी माध्यमांशी बोलण्याचे देखील टाळले आहे. तानाजी सावंत यांनी फेसबुकचा प्रोफाईल सोबत प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढल्याने चर्चांणा उधाण आले आहेत. त्यांनी प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला आहे. तर पक्षचिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो लावला आहे.
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेश सुरू असून या अधिवेशनाला तानाजी सावंत यांनी दांडी मारली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या दिवसापासून ते नागपूर येथून निघून आले आहेत. त्यांनी नागपूरमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्येच बॅग पॅक करून पुण्याला आल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या