Bus Accident: ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली असून या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती.
संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव अशी चार मृतांची नावे असून पाचव्या मृत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. ताम्हीणी घाटात पर्पल ट्रॅव्हल्सची खाजगी बसमधून (MH14GU3405) जाधव कुटुंबीय पुण्यातील लोहगाव येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात होते. ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी पलटी झाली आहे. यामधे २ पुरुष व ३ महिला अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २७ जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी काम करत आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळळी ९ ते ९.३० च्या सुमारास घडला असून, बसमध्ये ४० च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या आपघतातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोहगाव येथून एका ट्रॅव्हल्समधून लग्नाचे वऱ्हाड हे महाडला लग्न समारंभासाठी जात होते. ही बस ताम्हिणी घाटातून जात होती. आज सकाळी पहाटेच्या सुमारास ही बस घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ आली. यावेळी चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने ही बस वळणावरून पलटी झाली. या अपघात तीन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. तर रेस्क्यू टीम, आणि रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना तातडीने माण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना पोस्को कंपनीच्या ऍम्ब्युलन्समध्येच तातडीने उपचार करण्यात आले.
ताम्हिणी घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत. या घाटात सर्वाधिक पाऊस पडतो. यामुळे येथील रस्त्यांची अवस्था अधिकच खराब होते. त्यामुळे या घाटात अपघात सातत्याने होत असतात. येथील वारंवर घडणाऱ्या अपघातामुळे रस्ते सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या