मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tamhini Ghat accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात! शाळेची सहल घेऊन जाणारी बस उलटली; २ ठार ५५ जखमी

Tamhini Ghat accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात! शाळेची सहल घेऊन जाणारी बस उलटली; २ ठार ५५ जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 30, 2023 10:52 AM IST

Tamhini Ghat accident : पुण्याहून रायगडला कोकणात शाळेची सहल घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात उलटून भीषण अपघात झाला आहे. यात २ ठार तर ५५ जण जखमी झाले आहेत.

Tamhini Ghat accident
Tamhini Ghat accident

Raigad Accident : पुण्यातून शाळेची सहल घेऊन जाणाऱ्या एका बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ही बस कोंडेघर गाव हद्दीत उलटली असून यात दोघे ठार झाले आहे तर ५५ जण जखमी झाले आहे. मृतांची नावे समजू शकली नाही. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथक रवाना झाले आहे. दरम्यान अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य राबवून बसमध्ये अडकले असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.

पुण्याकडून माणगावकडे येताना ट्रॅव्हल बस उलटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्याहून हरिहरेश्वरला सहल घेऊन जात असताना या बसचा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ या मार्गवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी येथील वाहतूक ही सुरळीत केली आहे.

माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ताम्हिणी घाटात सकाळी सातच्या सुमारास एमएच ०४ एफके ६२९९ ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याहून माणगावच्या दिशेने जात होती. या बसमध्ये काही पर्यटक आणि शालेय विद्यार्थी होते. दरम्यान, ही बस कोंडेघर गावाच्या हद्दीत आल्यावर बसचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यात दोन महिला ठार झाल्या.

Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी वर्णी

मिळालेल्या माहीतीनुसार पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात होती. यावेळी एका वळणावर कोंडेघर गाव हद्दीत ही बस उलटली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव इथून बचाव पथके आणि रुग्णवाहीका घटना स्थळाकडे रवाना करण्यात आले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. हा अपघात आज सकाळी ७ च्या सुमारास घडला.

ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. यावेळी कोंडेघर गाव परिसरातील नागरीक घटनास्थळी येत त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

WhatsApp channel

विभाग