मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Talathi Bharti : नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात ४,६४४ तलाठी पदांची भरती; आजपासून करता येणार अर्ज

Talathi Bharti : नोकरीची सुवर्णसंधी! राज्यात ४,६४४ तलाठी पदांची भरती; आजपासून करता येणार अर्ज

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 26, 2023 01:33 PM IST

Maharashtra Talathi Bharti 2023 : राज्यात तलाठी पदासाठी ४,६४४ जागा भरली जाणार असून त्या भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे.

Talathi Bharti
Talathi Bharti

Maharashtra Talathi Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. राज्यात तलाठी पदाच्या तब्बल ४,६४४ हजार जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची जाहिरात सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. भरतीचे ऑनलाइन अर्ज आजपासून उपलब्ध होणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै आहे. https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येईल.

अशी होईल परीक्षा

तलाठी पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. परीक्षेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असेल. परीक्षार्थी पदवीधर व माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय शिकलेला असला पाहिजे. सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

पदाचे नाव : तलाठी

पद संख्या : ४६४४ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारांसाठी ४३ वर्षे)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग रु. १०००/- राखीव प्रवर्ग : ९००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जुलै २०२३

तुमच्या जिल्ह्यात किती जागा?

अहमदनगर - २५०, अकोला - ४१, अमरावती - ५६, संभाजीनगर - १६१, बीड - १८७, भंडारा - ६७, बुलढाणा - ४९, चंद्रपूर - १६७, धुळे - २०५, गडचिरोली - १५८, गोंदिया - ६०, हिंगोली - ७६, जालना - ११८, जळगाव - २०८, कोल्हापूर - ५६, वर्धा - ७८, लातूर - ६३, वाशिम - १९, नागपूर - १७७, नांदेड - ११९, नंदुरबार - ५४, नाशिक - २६८, धाराशिव - ११०, परभणी - १०५, पुणे - ३८३, रायगड - २४१, रत्नागिरी - १८५, सांगली - ९८, सातारा - १५३, सिंधुदुर्ग - १४३, सोलापूर - १९७, ठाणे - ६५, मुंबई उपनगर - ४३, यवतमाळ- १२३, मुंबई शहर - १९, पालघर - १४२

WhatsApp channel