मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्याप्रमाणेच ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिकेला आदेश

पुण्याप्रमाणेच ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिकेला आदेश

Jun 27, 2024 11:34 AM IST

Illegal Pubs Bars in Thane, Mira Bhayandar : ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांना दिले आहे.

पुण्याप्रमानेच ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिकेला आदेश
पुण्याप्रमानेच ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिकेला आदेश

Illegal Pubs Bars in Thane, Mira Bhayandar : पुण्यात फर्ग्युसन मार्गावर असणाऱ्या एका पबमध्ये काही मुले ड्रग्सचे सेवन करतांना आढळले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील अनधिकृत पब आणि बार वर बुलडोझर फिरवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवण्याचे व शहर ड्रग्समुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस प्रशासन आणि पालिका आयुक्तांना दिले आहेत.

राज्यात अनधिकृत पब, बार, हॉटेल यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी ड्रग्सचे सेवन होत असल्याचे आढळलं आहे. पुण्यात कल्याणी नगर येथील पोर्शे कार दुर्घटना आणि त्यानंतर फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्ये ड्रग्सचे सेवन होत असल्याचे आढळल्यानंतर पुण्यातील पब संस्कृतीवर कारवाईची मागणी होत होती. पालिका आणि पुणे पोलिसांनी याची दखल घेत अनेक अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करत ते पाडून टाकण्यात आले. पुण्यातील ड्रग्स तस्करांवर आणि पब हॉटेलवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. प्रसंगी बुलडोजर फिरवा असे निर्देश देखील शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर आता ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे शहरामध्ये यासंदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात येणार आहेत.

अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

पुण्यात मोठी कारवाई

पुण्यातील हॉटेल, बार आणि पबमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे ड्रग्स आणि मद्याची विक्री होत असल्याचे उघड झाल्यावर पुणे पालिकेने कोरेगाव पार्क, बाणेर, बालेवाडी भागातील अनाधिकृत बांधकाम केलेल्या १९ रेस्टॉरंट, बार, रुफटॉप हॉटेलवर कारवाई केली. त्यामध्ये ५६ हजार ६१ चौरस फुटाचे बांधकामावर बुलडोझरने तोडण्यात आले आहे. १९ मे रोजी कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात झाल्यावर महापालिकेने शहरात रूफ टॉप हॉटेल, हॉटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत १४४ हॉटेलवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई मंदावली होती. एल ३ पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरु असल्याचे समोर आल्यावर आता ही कारवाई पुन्हा तीव्र करण्यात आली आहे.

WhatsApp channel
विभाग